सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोेंदवले: माण विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा आहे. याबाबत आपण सर्वांनी निश्चिंत रहा असा ठाम विश्वास प्रभाकर देशमुख यांनी दहिवडीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांच्यावर टीका करणार्या आमदार जयकुमार गोरे यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला.
‘यावर खुलासा करा’
दीपक देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीवरती असे आरोप होणं आणि ते प्रकरण उच्च न्यायालयात जाणं, दोनशे मयतांवर उपचार केल्याचे दाखवून त्याचे पैसे हडपणे, हे सर्वच अतिशय गंभीर आहे. याबद्दल त्यांनी खुलासा करण्याची करण्याची आवश्यकता आहे. त्याबद्दल खुलासा न करता पाण्याच्या कामाला चालना देत असलेल्या खासदारांवर टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये. याऐवजी हक्काच्या साडेबारा टीएमसी मधील दोन तृतीयांश पाणी का बाहेर जातंय हे सांगावं, असं आव्हान देशमुख यांनी दिले.
दरम्यान, धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार होवून फक्त दोन महिनेच झालेत. दोन महिन्यात त्यांना जनतेचं दुःख समजलंय मात्र पंधरा वर्षे आमदार असलेल्या माणसाला हे समजलं नाही हे दुर्दैव आहे. खरंतर खासदारांना नाही तर झोपी गेलेल्या तुम्हालाच जागे होण्याची, आत्मपरीक्षणाची गरज आहे असा टोला त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.
No comments:
Post a Comment