लष्कराने सांगली येथे पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी पथक पाठवले आहे. यामध्ये अभियंता कृती दल , पायदळ आणि वैद्यकीय पथकातील सुमारे 100 जवानांचा समावेश असून हे पथक जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर बचाव उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आले आहे. या पथकाने जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांसह सर्व संबंधितांबरोबर तातडीच्या बैठका घेतल्या. आज सकाळी सर्व ठिकाणांची संयुक्त तपासणी करण्यात आली आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यात आवश्यक मदत आणि सहाय्य पुरवण्यासाठी बचाव नौका आणि इतर आरोग्य सेवा सामग्रीसह लष्कराचे पथक तैनात करण्यात आले आहे.
Sunday, July 28, 2024
Home
Unlabelled
सांगली येथील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भारतीय लष्कराची मदत

About सत्य सह्याद्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment