भेकवली/महाबळेश्वर
: महाबळेश्वर तालुक्यातील धारदेव घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे.
आज दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच ठिकाणी दरड कोसळली असून मार्ग वाहतुकीसाठी
पुन्हा एकदा बंद झाला झाल्याने आजूबाजूच्या गावातील महाबळेश्वर ला
कामानिमित्त येणाऱ्यांना निराश होत माघारी परतावे लागले.
महाबळेश्वर तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून ठिकठिकाणी
रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दि.२७ रोजी मोळेश्वर ते कास
राजमार्गावर भली मोठी दरड रस्त्यावर कोसळली होती. दुपार पर्यंत जेसीबी च्या
साह्याने दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला गेल्याने येथील वाहतूक
सुरळीत सुरू झाली. परंतु, आज पहाटे त्याच ठिकाणी दरड कोसळल्याने मार्ग बंद
झाला आहे. राजमार्गावरून प्रवास करणाऱ्यांना यामुळे त्रास सहन करावा लागला
असून दरड हटवून मार्ग मोकळा करावा अशी मागणी येथील नागरिक, वाहनचालकांमधून
होत आहे.
No comments:
Post a Comment