सोनके येथे घरफोडीत दोन लाखाच्या दागिन्यांची चोरी. आरोपी आठ ताब्यात वाठार पोलिसांची धडाकेबाज कारवाई. - सत्य सह्याद्री

Monday, August 12, 2024

सोनके येथे घरफोडीत दोन लाखाच्या दागिन्यांची चोरी. आरोपी आठ ताब्यात वाठार पोलिसांची धडाकेबाज कारवाई.


पिंपोडे 
 सोनके ता.कोरेगाव येथे उघड्या घरातून गुरुवार दि, ८ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट रोजी दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली.
याबाबत वाठार पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनके ता. कोरेगाव येथील अन्वरबी बाबामिया आतार  यांच्या राहत्या उघड्या घरातून गुरुवार दि, ८ ते शुक्रवार दि, ९ रोजी अज्ञात चोरट्याने दुपारच्या सुमारास लाकडी कपाटात असलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे झुबे, कानातील वेल (एकूण पाच तोळे सोने) व अडीच हजार रुपये रोख असे एक लाख ९८ हजार पाचशे रुपयांचे दागिने चोरी झाल्याची तक्रार आतार यांनी दि, ११ रोजी दिली होती. दाखल गुन्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या सूचनेनुसार वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, गुन्हे प्रकटीकरण कर्मचारी गणेश इथापे, प्रकाश चव्हाण,डी.जी पवार, यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत सदर घटनेतील चोरी करणाऱ्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संशयित आरोपी रोहन राजू सावंत वय २२ रा.आदर्शनगर वाठार स्टेशन ता. कोरेगाव जि.सातारा यास ताब्यात घेतल्यानंतर चोरी केल्याचे कबूल केले. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
आतार यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याचे काम चालू असल्याने संबंधित संशयित आरोपी हा त्यांच्याकडे सेंट्रींगचे काम करत होता.गुरुवार दि, ८ रोजी दुपारी घरात कोणी नसल्याने संधीचा गैरफायदा घेऊन लाकडी कपाटात असलेले पाच तोळे सोन्याचे दागिने व रोखडवर हात मारला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासाच्या चक्रव्ह्यूवात तो अलगद अडकला. चोरीचा तपास करत असताना संबंधित घरमालकास चोरी झालेल्या दिवशी दरम्यान कोण कोण येऊन गेले याची खातरजमा गुन्हे प्रकटीकरण पथकास झाल्यानंतर या चोरीच्या घटनेत संबंधित संशयित आरोपी रोहन याच्याकडे अधिकचा तपास केल्यावर व पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली व चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.

 

No comments:

Post a Comment