सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
बारामती: फलटणच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारच्या व्यासपीठावर रामराजे दिसत नाहीत, या प्रश्नावर मी त्यांना नोटीस काढतो, असे सांगून अजित दादांनी एकाच वाक्यात रामराजे नाईक निंबाळकरांच्या अनुपस्थितीचा मुद्दा निकालात काढला.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. रामराजे यांच्या मर्जीतील फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्यासह रामराजेंचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे रामराजे सध्या दोन डगरीवर पाय ठेवून उभे आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित होणार हे साहजिक होते.
रामराजे नाईक निंबाळकर हे फलटणसह सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात का दिसत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, रामराजे प्रचारात दिसत नसतील तर मी त्यांना नोटीस काढतो, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिल्याने रामराजेंचे अजित पवार गटातील महत्त्व कमी झाल्याचे दिसून आले आहे. फलटण विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणार्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत ही चर्चेची आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघावर गेली 35 वर्षे एकहाती रामराजे यांची सत्ता आहे. फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी रामराजे आणि बंधू संजीवराजे व रघुनाथराजे यांचीच सत्ता पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या वेळी विरोधक म्हणून नवे नेतृत्व उभे राहिले त्या त्या वेळी रामराजे यांनी त्यांची राजकीय ताकत दाखवली आहे. परंतु लोकसभेसारखी महत्त्वाची निवडणूक जिंकून रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नवीन सक्षम विरोधक म्हणून राजेगटाला आव्हान दिले आणि ते कायम असल्यानेच रामराजेंची राजकीय गोची झाल्याचे मानले जात आहे.
Wednesday, November 6, 2024
Home
Unlabelled
अजितदादांनी एका वाक्यात संपवला रामराजेंचा मुद्दा
अजितदादांनी एका वाक्यात संपवला रामराजेंचा मुद्दा
About सत्य सह्याद्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment