फलटण
प्रतिनीधी - माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर फलटण येथे लाडकी बहीण
सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून आगामी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन करत,
आमदारकीच्या उमेदवारीबाबत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती भाजपचे
जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
दिनांक
११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता फलटण येथील यशवंतराव चव्हाण
हायस्कूल मैदानावर लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळावा
आयोजित केला असून शक्तिप्रदर्शन करत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,
फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत मोठा निर्णय जाहीर घोषणा
करणार आहेत. तरी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयकुमार
शिंदे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment