बेटाला रेती घाटावर अपघात: मजूर लोकेश बुधे यांचा मृत्यू, चालक व डेपो मालकावर गुन्हा दाखल - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, February 20, 2025

बेटाला रेती घाटावर अपघात: मजूर लोकेश बुधे यांचा मृत्यू, चालक व डेपो मालकावर गुन्हा दाखल


जिल्हा प्रतिनिधी / हंसराज भंडारा 
बेटाला - मोहाडी तालुक्यात येणाऱ्या बेटाला , दिनांक 16/02/2025, 09/15 वा. सुमारास मौजा बेटाळा वैनगंगा रेती घाट नदीपात्र येथे ट्रॅक्टर चालक कैलाश धनराज ठवकर रा- बेटाळा वय 37 वर्षे , बेटाळा रेती घाट डेपो मालक हा त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर क्र. MH-36/AG-1839 व ट्रॉली क.MH-36/AG-1801 ने रेती भरण्याकरीता बेटाळा रेती घाट डेपो येथे घेवून डंपरवर रेती खाली केली असता ट्रैक्टर ट्रॉलीच्या हायड्रोलीक मध्ये बिघाड आल्याने ट्रॉली ही पुर्णपणे वर गेली नाही व अर्धया मध्ये ट्रॉली लटकून असल्याने यातील मजुर लोकेश बुझे व चालक कैलाश ठवकर है ट्रॅक्टरखाली उतरून हायड्रोलीक पाईपचा एअर काढत असता अचानक हायड्रोलीक पाईपसह खाली आल्याने मजुर बुधे लोकेश हा ट्रॉलीच्या चेचीस व ट्रॉलीच्या मध्ये दबल्याने त्याला लोकांच्या मदतीने बाहेर काढले तेंव्हा लोकेशला डोक्याला व मानेला गंभीर जखम झाल्याने त्याला उपचाराकरीता सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेले असता तेथील MO शा. यांनी तपासुन मृत घोषीत केले. रेती घाटावर विविध वाहाणाचे तांत्रिक दुरूस्ती करीता रेती डेपोवर मेकॅनिक हजर ठेवणे आवश्यक असताना सुद्धा मेकॅनिक ठेवले नाही. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन मजुरांना सुरक्षा प्रदाण करणारे साहीत्य पुरविणे आवश्यक होते परंतु मजुरांना सुरक्षा प्रदाण करणारे कोणतेही साहीत्य पुरविले नाही. अशा प्रकारे नमूद आरोपी ट्रॅक्टर चालक व मौजा बेटाळा रेती डेपो मालक यांच्या हयगयी व निष्काळजीपणामुळे अपघात होवून लोकेश दशरथ बुधे यांच्या मृत्युस कारणीभुत झाले आहे. अशा सरतर्फे फिर्यादी कांतिकराम जलिराम दूधकावरा वय 38 वर्षे मो. उपनि, पोरटे मोहाडी यांचे लेखी चोकशी अहवालावरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे कायमी अप क्रमांक 21/2025 कलम 106 (1) 3(5) भा.न्या.स. 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो.नि. बेलखेडे है करीत आहेत.

No comments:

Post a Comment