सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध
औंध: लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून औंधमधील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांसाठी तंत्रज्ञानाच्या युगात एक शैक्षणिक प्रगतीचे साधन असणारा स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. औंधमधील अण्णाभाऊ साठे मंडळाच्या वतीने यंदा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी तंत्रज्ञानाच्या या युगात तयार होणारी नवी पिढी स्मार्ट बनावी असा संकल्प करण्यात आला. याच संकल्पाची सुरुवात म्हणून औंधमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्ही आणि पेन ड्राइव्ह भेट देण्यात आला. डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक गतीने ज्ञान प्राप्त करता येईल व हे सर्वसामान्य कुटुंबातील विध्यार्थी भविष्यात उज्वल यशकिर्ती प्राप्त करून आपला व औंधचा नावलौकिक उंच करतील हीच भावना मनामध्ये घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. अण्णा भाऊ साठे मंडळातील कार्यकर्त्यांनी येणाऱ्या पिढीला स्मार्ट बनविण्याच्या हेतूने केलेली ही सुरुवात एक आदर्श मानली जात आहे. कोणत्याही महान कार्य असलेल्या व्यक्तींच्या जयंतीनिमित्त अथवा पुण्यतिथीनिमित्त असे शैक्षणिक, समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजेत हीच खरी त्या महात्म्यांना आदरांजली असेल.
या कार्यक्रमप्रसंगी औंध ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तानाजी इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण इंगळे, माधव इंगळे, सुहास इंगळे, रोहित इंगळे, मंदार कुंभार, अमोल इंगळे, पै. कुलदीप इंगळे, मुख्याध्यापिका कल्पना वाडेकर, संग्राम गोसावी, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments