मायणी दि. २८ प्रतिनिधी तानाजी चव्हाण
मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात सकल मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दि.२९ रोजी मुंबई येथे उपोषण सुरू करणार आहेत.या आंदोलनासाठी मायणी व परिसरातील गावांमधून सुमारे दहा हजार मराठा समाज बांधव मुंबईस जाणार असल्याची माहिती मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ.विकास देशमुख यांनी मायणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भात ते म्हणाले,गेले १५ ते २० दिवस मायणी परिसरातील जवळपास २५ ते ३० गावांमध्ये घोंगडी बैठकाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनात परिसरातील गावातून जवळपास ४०० वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे .दि. २८ रोजी सायंकाळी सकल मराठा समाज बांधव मुंबईस प्रस्थान करणार आहेत.जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये उपोषण सुरू ठेवल्यास सकल मराठा समाजाचे बांधव मायणी येथे साखळी उपोषण करणार आहेत.मुंबईस जाणाऱ्या सर्व समाज बांधवांची राहणे, जेवण,पेट्रोल,डिझेल आदि व्यवस्था मराठा बांधव स्वतःच्या खिशातून पैसे जमा करून करणार आहेत .
सदर पत्रकार परिषदेस मायणीचे सरपंच प्रतिनिधी रणजित माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्निल घाडगे,हेमंत जाधव, विलास सोमदे,किसन सोमदे,प्रविण वाघ,धनाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments