Ticker

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडी एकदिलाने निवडणुकीत उतरणार – शशिकांत शिंदे

 

सत्‍य सह्याद्री न्‍यूज नेटवर्क

मायणी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खटाव-माण मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सातारा येथील राष्ट्रवादी जिल्‍हा भवन येथे पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून एकदिलाने सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीस जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, मायणी येथील युवा नेते हिंमत देशमुख, मकरंद बोडके,  यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन विकासाचा अजेंडा राबवायचा आहे. आगामी निवडणुकांत एकजुटीने काम करून आघाडीचा विजय निश्चित करायचा आहे.”

यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसंबंधी दिशा देण्यात आली. मतदारसंघातील स्थानिक प्रश्न, ग्रामीण भागातील विकासकामे व आघाडीचे धोरण याबाबत चर्चा झाली. युवकांच्या सक्रिय सहभागावरही भर देण्यात आला.

बैठकीच्या शेवटी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून आगामी निवडणुका यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments