गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर सातारा शहरातून शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस, वाहतूक शाखा
यांच्यावतीने संचलन करण्यात आले. हे संचालन सातारा तालिम संघ येथून पोलीस
मुख्यालय, शिवतीर्थ, राजपथमार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून शहर
पोलीस ठाण्याजवळ समारोप करण्यात आला. या संचालनामध्ये शाहुपूरी पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव
यांच्यासह कर्मचारी, वाहने सहभागी झाली होती.
0 Comments