Ticker

6/recent/ticker-posts

डॉक्टर युवतीचा पाठलाग, धमकी, एकावर गुन्हा


सत्य सह्याद्री/सातारा

शहर परिसरातील एका रुग्णालयात कामाला असलेल्या डॉक्टर महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास सांगून तुझ्या नवऱ्याला मारुन टाकेन, तुझे करिअर बरबाद करेन,तू प्रेग्नंट आहेस, म्हणून वाचलीस माझ्याकडे असलेले व्हीडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी तसेच पीडित युवतीचे नग्न अवस्थेतील अश्लील फोटो ठेवून बदनामी केल्याप्रकरणी अक्षय अमृतलाल मेहता (वय ३४, रा.मोळाचा ओढा, ता. सातारा) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सदरचे व्हीडीओ डिलिट करण्यास सांगितल्यानंतर त्याने  तू कंप्लेंट करून मला त्रास दिला. तू नवऱ्याला सोडून माझ्याकडे ये, मला तुला दुसऱ्या कोणाबरोबर बघायचे नाही, नाहीतर मी जिवाचे बरेवाईट करुन घेईन, तुझ्या नवऱ्याला गाडीने उडवून टाकेन व बरबाद करीन, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. नोव्हेंबर २०२५ ते १४ एप्रिल दरम्यान वेळोवेळी हा प्रकार घडला आहे. पोलीस निरिक्षक म्हेत्रे तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments