Ticker

6/recent/ticker-posts

आंबेनळी घाटात दुचाकी दरीत कोसळून सोनगीरवाडीतील दांपत्याचा दुर्दैवी अंत


पोलादपूर (सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क): आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावर दुचाकी घसरून दाम्पत्य सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना कुंभरोशी गावाजवळ गुरुवारी घडली.
पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, स्प्लेंडर दुचाकी बॅरिकेटमध्ये अडकलेली आढळली. शोधमोहीम राबविल्यानंतर दरीत दोघांचे मृतदेह सापडले. मोहन चव्हाण (वय ५५) व जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगीरवाडी) अशी मृतांची ओळख पटली.
अवकाळी पाऊस व दाट धुके यामुळे बचावकार्याला अडथळे निर्माण झाले. प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स व पोलीस यांनी संयुक्तरीत्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले.
▪️ घाटातील धोकादायक वळणांचा प्रश्न ऐरणीवर
आंबेनळी घाटातील तीव्र वळणे व घसरडे रस्ते यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments