सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा :
स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याच्या मातीत इतिहास पुन्हा एकदा जागा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची परंपरा जपणाऱ्या घराण्यांचा पहिला राजधानी सातारा शिवस्वराज्य रथ सोहळा शाहूनगरीत दिमाखात अन उत्साहात पार पडला. साताऱ्याच्या रस्त्यांवर स्वराज्याची ओळख, परंपरा अन अभिमान यांचे जिवंत चित्र पाहायला मिळाले.
पुणे येथे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या घराण्यांचा शिवस्वराज्य रथ सोहळा आयोजित केला जातो. १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या या उपक्रमात महाराष्ट्रभरातील तसेच साताऱ्यातील घराण्यांचे वारसदार सहभागी होतात. गेली १२ ते १३ वर्षे सुरु असलेल्या या परंपरेला यंदा साताऱ्याची जोड मिळाली.
सातारा ही स्वराज्याची राजधानी असल्याने हा सोहळा इथे व्हावा, अशी भावना अनेकांच्या मनात होती. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विवेकानंद बाबर अन धनंजय पवार यांनी यावर चर्चा करून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. टॉप गियर ग्रुपचे शशिकांत पवार अन दत्तात्रय गायकवाड यांच्या सहकार्याने विविध घराण्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधण्यात आला.
अल्प कालावधीत बैठका घेऊन सोहळ्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. सामाजिक सलोखा जपण्याचा विचार पुढे ठेवण्यात आला. बारा बलुतेदार समाजांचे स्वराज्य रथ सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न झाले. मात्र वेळेअभावी काही घराणी अन समाज सहभागी होऊ शकले नाहीत. तरीही श्रीमंत धार पवार घराणे, सरदार शिंदे सरकार घराणे, सरदार जाधवराव घराणे, सरदार गायकवाड घराणे, सरदार साबळे घराणे, सरदार इंदलकर घराणे अन सरदार काकडे घराणे यांनी सहभाग नोंदवला.
या शोभायात्रेला एकजूट देण्यासाठी नगरसेवक रवि पवार, सागर पवार, संतोष शिंदे, सुजय शिंदे, तुषार इंदलकर पाटील, अमर पाटील, ओमकार गायकवाड, सागर गायकवाड, अजय जाधव, महेश जाधव, प्रविण साबळे, अरुण काकडे अन विजय काकडे यांनी मोलाची भूमिका बजावली. साताऱ्याच्या मातीतील स्वाभिमान, परंपरा अन एकजूट यांचा हा जिवंत प्रत्यय असल्याच्या प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत.

0 Comments