Ticker

6/recent/ticker-posts

व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक अन ८.९१ लाखांचा फटका

 

सातारा : सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

शाहूपुरी परिसरात व्हॉट्सअॅप लिंकद्वारे जेष्ठ नागरिकाची तब्बल ८ लाख ९१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुधीर वसंत परचुरे (वय ७६, रा. पवार कॉलनी, शाहूपुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अज्ञात इसमाने फोन करून स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. वरिष्ठ नागरिक योजनेचा लाभ मिळेल, असे आमिष दाखवत त्याने व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवली.

फिर्यादीने संबंधित लिंक उघडताच त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या संयुक्त खात्यातून एकूण ८.९१ लाख रुपये अज्ञात खात्यावर वळते करण्यात आले. व्यवहार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.

Post a Comment

0 Comments