व्याजाने घेतलेले पैसे वेळेत परत न दिल्याने दमदाटी करणार्या साखरवाडी (ता. फलटण) येथील 8 सावकारांविरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहीत अशी, फिर्यादी बाळासो संपतराव निंबाळकर (वय 49 रा.साखरवाडी) यांना जनार्दन काशिनाथ भोसले, रामा काशिनाथ भोसले, काशिनाथ भोसले, अंजना भीमराव बर्गे, उमेश भोसले, दादा रुपनवर, अरुण तुकाराम इंगळे, धनाजी महादेव घाडगे सर्व रा.साखरवाडी यांनी 1 लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्याच्या व्याजापोटी वेळोवेळी 8लाख 83 हजार रुपये घेऊन निंबाळकर यांचे घर अंजना बर्गे हिचे नावावर करुन घेतले. उर्वरीत व्याजाचे पैसे परत न दिल्याने वरील पैकी काशिनाथ भोले, अंजना बर्गे, उमेश भोसले, दादा रुपनवर, अरुण इंगळे, धनाजी घाडगे यांना पाठवून निंबाळकर यांना जनार्दन व रामा यांचे पैसे का दिले नाहीत असे म्हणून दमदाटी केली. शिवाय तू पोलिसात तक्रार दिली तर पाय तोडण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ,दमदाटी केली असल्याची फिर्याद नोंदवण्यात आली असून या फिर्यादीनुसार आठ जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि बी.डी.शिंदे करीत आहेत.

0 Comments