
हुमगाव, 18 सप्टेंबर-
जलतरण स्पर्धेसाठी जात असताना दुर्दैवी अपघाती अंत झालेला हुमगाव येथील जलतरणपटू अर्थव मिलिंद शिंदे ला निरोप देताना सारे हुमगाव गहिवरून गेले. साश्रूपूर्ण नयनांनी निरंजना नदीतीरी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी 3 च्या सुमारास पिता डॉ मिलिंद शिंदे यांनी अर्थव च्या चितेस मुखाग्नी दिला.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुंरे , ऋषिकांत शिंदे या सह जावळी सातारा, मुंबई, पुणे विभागातून आलेले शिंदे घराण्यावर प्रेम करणारे व सातारा शहरातून आलेल्या शेकडो खेळाडू धावपटूंनी जलतरणपटू अर्थव शिंदेला श्रद्धांजली वाहिली. सोमवारी
दुपारी 2 च्या सुमारास अर्थव शिंदे यांचा मृतदेह हुमगाव येथे आणण्यात आला. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अर्थवची अंत्ययात्रा काढण्यात आली. अमर रहे अमर रहे च्या घोषणा युवकांकडून देण्यात येत होत्या. रुग्णवाहिकेतून पार्थिव हुमगाव हायस्कूल येथे आणण्यात आले तिथून सजवलेल्या ट्रॅक्टर मधून अथर्व ची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शाळेतील विध्यार्थी सहभागी झाले होते. अमर रहे अमर रहे च्या जयघोषात अथर्व चे पार्थिव त्याच्या निवासस्थानी आणण्यात आले, त्यानंतर त्याच्या अंत्यदर्शनासाठी हुमगावसह जावळी तलीक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अथर्व च्या कुटुंबीय चा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता
त्याच्या आईने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांची तर अक्षरशः मने हेलावली.
या दुःखद घटनेने गावावर शोककळा पसरली होती.
अर्थव शिंदे या छोट्या जलतरणपटूने अवघ्या 14 वर्षाच्या आयुष्यात अनेक रेकॉर्ड ब्रेक केल्याच्या कारकिर्दीला अनेकांनी उजाळा दिला.

0 Comments