मायणी :-
येथील फुलेनगर रस्त्यालगत दादा उर्फ हरीश बबन साठे (वय २९) या तृतीय पंथीयची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिससूत्र व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी,आज (शुक्रवार) सकाळी फुलेनगर रस्त्यावर नेहमी प्रमाणे रहदारी करणाऱ्या नागरिकांना चांद नदीच्या कडेला अंगावर साडी असलेली व्यक्ती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गवतामध्ये निपचिप पडलेली आढळली , हि घटना पाहणाऱ्या व्यक्तीने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्वरित घटनास्थळी पोलिस दाखल त्यांनी त्या व्यक्तीची तपासणी केली असता ती व्यक्ती वरील प्रमाणे दादा उर्फ हरीश बबन साठे असल्याचे समोर आले, हि व्यक्ती तृतीय पंथीय असल्याचे समजते.या घटनेमुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू करून दोन संशियिताना पकडले असून त्यांचेकडे कसून चौकशी सुरु आहे. या घटनेची वार्ता मायणी व परिसरात पसरल्याने लोकांनी या घटनास्थळी धाव घेतल्याने बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती. मृत व्यक्ती मातंग समाजाची असल्याने येथील या समाजाच्या संघटनांनी तातडीने एकत्र येऊन मोठ्या संख्येने युवक ,व नागरिकांनी पोलीस स्टेशन वर मोर्चा नेऊन या घटनेचा निषेध करताना संबधित आरोपींकडक कारवाईची मागणी केली .
यावेळी पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु उपस्थित जमावस सपोनि संतोष गोसावी यांनी शांततेचे आवाहन करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे व पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी ताबडतोब मायणीकडे धाव घेवून घटनास्थळाची पाहणी केली.

0 Comments