मायणी-
येथील दादा उर्फ हरीश बबन साठे (वय 29) या तृतीय पंथीयाची धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर तपासाची सूत्रे गतिमान करत पोलिसांनी बापूराव महादेव पाटोळे व गणेश आप्पासो पाटोळे (दोघेही राहणार रामोशीगल्ली, मायणी) या दोन आरोपींना दीड तासात जेरबंद केले. या
पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी बापूराव पाटोळे याला खानापूर तालुक्यातील कार्वे येथे पकडले. त्याने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. बाबुराव पाटोळे याने आपल्या राहत्या घरात हरीश उर्फ दादा यांचा धारधार शास्त्राने गळा चिरून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरापासून अंदाजे चारशे ते पाचशे फूट अंतरावरील चांद नदीनजीक असणार्या फुलेनगर रस्त्याजवळील गवतात नेऊन टाकला. त्यामुळे याप्रकरणी गणेश पाटोळे यास सहआरोपी म्हणून पोलिसांनी मायणीतून अटक करण्यात आली आहे.
मृत हरीश साठेंच्या खुनानंतर मायणीतील सामाजिक कार्यकर्ते व काही संघटनांना तातडीने एकत्र करून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला व या घटनेचा निषेध केला. संबधित आरोपींवर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
जमाव जमल्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, उपस्थित जमावास सपोनि संतोष गोसावी यांनी शांततेचे आवाहन करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तद्नंतर जमाव शांत झाला.
हरीश उर्फ दादा याच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर कलेढोणये थील कुटीर रुग्णालयात पोस्टमॉर्टेम करून मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे व पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष गोसावी व कर्मचारी करीत आहेत.
0 Comments