Hot Posts

6/recent/ticker-posts

दारूसाठी पैसे मागणार्‍या मावसभावाचा खून फलटण येथील घटना


फलटण
दारु पिण्यास पैसे मागून त्रास देणार्‍या मावस भावाचा डोक्यात पाईप घालून  खून केल्याची धक्कादायक घटना फलटण येथे शनिवारी रात्री घडली. खून करुन आरोपी स्वतःहून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खुनाची कबुली दिली.
 याबाबत फलटण शहर पोाजलसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश उर्फ भरत बाळासाहेब लिंबरकर (वय 24 रा. नागेश्‍वरनगर चौधरवाडी ता. फलटण) हा गणेश सोमनाथ निमगिरे (रा. नागेश्‍वरनगर चौधरवाडी ता. फलटण) यास दारु पिण्यास वारंवार पैसे मागून त्रास देत होत होता. या कारणावरुन गणेश निमगिरे याने गणेश लिंबरकर यास जिंती नाका येथून सोबत घेऊन त्याचा तांबमळा सातारा रोडवर फरांदवाडी गावच्या हद्दीत नेऊन लोखंडी पाईपने डोक्यास मारहाण करुन खून केला. या खुनाची कबुली गणेश ाजनमाजगरे याने शहर पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून दिल्यामुळे खळबळ उडाली.
 खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या सांगण्यावरून पोलीस जीपच्या लाईटच्या व बटरीच्या उजेडात तांबमळा ते सातारा रोडवर जाणार्‍या रस्यावर शोधाशोध सुरू केली. त्यावेळी रस्त्याच्या पश्‍चिम बाजुला असलेल्या खड्ड्यात गणेश लिंबरकर हा मृतावस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन डोक्यातून मेंदू बाहेर येऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. याबाबतची फिर्याद मृत गणेशची आई सुनंदा लिंबरकर यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
  सुनंदा लिंबरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी, माझे पती बाळासाहेब, मुलगा गणेश उर्फ भरत असे एकत्रित राहतो. आमच्या घराशेजारीच माझ्या बहिणीचे पती सोमनाथ नामदेव निमगिरे व त्यांची नाना व गणेश ही दोन मुले राहतात. माझा मुलगा गणेश हा गणेश निमगिरे याच्या वडापावच्या गाड्यावर कामास जात होता. त्यास दारूचे व्यसन असल्यामुळे तो अधुनमधुन दारू पित होता. त्यामुळे तो वारंवार गणेश निमगिरेला दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. या रागातून त्याने माझ्या मुलाचा खून केल्याचेही सुनंदा लिंबरकर यांनी फिर्यादित म्हटले आहे. याची नोेंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments