Hot Posts

6/recent/ticker-posts

जगदंब मंडळाच्या रक्तदान व मोफत स्वाईन फ्ल्यू लस या उपक्रमास प्रतिसाद



मायणी ( प्रतिनिधी )विजय झोडगे
       येथील जगदंब सांस्कृतिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान व मोफत स्वाईन फ्ल्यू लस या उपक्रमास नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.दि. २८ रोजीच्या डान्स कॉप्मीटेशन कार्यक्रमास सिने व टी .व्ही.आभिनेता किरण माने यांची विशेष उपस्थिती.
       रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून सध्याच्या अत्यंत धावपळीच्या युगात रक्तदान ही काळाची गरज बनली आहे . ही बाब लक्षात घेऊन जगदंब सांस्कृतिक मंडळ व श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या मेडीकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास युवक वर्ग , अनिकेत पाटील मित्रपरिवार डी. फॉर्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.एकूण ६१ युवकांनी रक्तदान केले.
         सध्या पावसाळी वातावरणामुळे स्वाईन -फ्ल्यू या आजाराचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता असते.  हा आजार होऊ नये म्हणून येथील श्रेयस हॉस्पीटलेचे डॉ. सूर्यकांत मारुती कुंभार यांनी सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून एकूण ३३९ स्त्री - पुरुष व मुलांना स्वाईन फ्ल्यूच प्रतिबंधात्मक लस दिली. याही उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल नागरिक मंडळास धन्यवाद देत आहेत. फोटो

Post a Comment

0 Comments