Hot Posts

6/recent/ticker-posts

मायणीत मोठ्या जल्लोषात दुर्गादेवींचे स्वागत


मायणी/ विजय झोडगे 
संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दुर्गादेवी मायणी येथे  मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक वाद्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले . आज मूर्ती स्थापनेच्या मुख्य दिवशी  ठीक ठिकानाहुन  ज्योती आणण्याची गड़बड़ प्रत्येक मंडळांची व कार्यकर्त्यांची सुरु  होती.
औंध येथील यमाई मंदिर,कोल्हापुरची महालक्ष्मी,तुळजापुरची तुळजाभवानी या ठिकाणा हुन विविध मंडळांच्या ज्योति घेऊन शेकडो युवक रस्त्यांवरून आपल्या गावाकडे धावत होते. . सर्वत्रा भक्तिमय वातावरणात रात्री उशिरापर्यंत   मुतींची स्थापना करण्यात येत होती.. डॉल्बी सिस्टिमला दूर ठेवत पारंपरिक वाद्यना प्राधान्य देत बैंड,हलगी या पारंपरिक वाद्यचे समर्थन केले. सर्वत्र पारंपरिक ढोल ताशांच्या दणदणाट रात्री उशिरापर्यंत दुर्गादेवींची प्राण प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली . चांदणी चौक येथील विनायक दुर्गामाता मंडळ,खंडोबा माळ येथील जगदंब मंडळ,या मुख्य मंडळांच्यावतीने गावातून देवीची मिरवणूक काढण्यात आली .सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे.

Post a Comment

0 Comments