Hot Posts

6/recent/ticker-posts

" महिलांचे सक्षमीकरणकरण्यात हनुमान पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद: संजीव साळुंखे "

कलेढोण  वार्ताहर / नागेश चौधरी 

महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण करण्याकरिता हनुमान पतसंस्थेने विविध उपक्रम राबवून महिलांना सक्षम करण्याकरिता केलेले कार्य कोतुकास्पद आहे.असे प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंखे यांनी केले. ते हनुमान पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी शाहिस्तेखान मुलाणी, बाळासाहेब दबडे,राजू कणसे, आप्पा महाजन, राजू भूषारी, राजू शिकलगार, सत्यजित साळुंखे, शेखर महाजन, राजेंद्र नायकुडे, सदाशिव मुळीक, राजेंद्र लोखंडे,कृष्णा शिंदे तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
 ३१वर्षाचा आढावा घेत हनुमान पतसंस्थेने सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी केली असल्याचे सांगत संजीव साळुंखे पुढे म्हणाले या पतसंस्थेवरती लोकांचा विश्वास आहे आहे तसेच ही संस्था मोठ्या इमानदारीने सहकार क्षेत्रात काम करत असल्याने संस्थेची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे.महिला सबलीकरण व सक्षमीकरण करण्याकरिता संस्थेने मायक्रो फायनान्स या संकल्पनेतून महिलांना ५०,०००पर्यंत विनातारण कर्ज दिले आहे.संस्थने आतापर्यंत महिलांना साडे तीन कोटीचे अर्थसहाय्य केले आहे.संस्थेच्या ३००० पेक्षा जास्त महिला सभासद असून महिलांना मोफत प्रशिक्षण केंद्र निर्माण करुन फँशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, शिलाई काम याचे प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार निर्मितीसाठी भरीव योगदान दिले आहे.संजीव साळुंखे यांनी संस्थेच्या विविध कार्याचा आढावा देत सांगितले कि.या संस्थेने 'आदर्श पतसंस्था' म्हणून नावलौकिक मिळवले आहे.
 हनुमान पतसंस्थेत १२ कोटीच्या ठेवी असून चालू वर्षी २२लाख  रुपयांचा नफा संस्थेला मिळाला असल्याचे संस्थेचे व्यवस्थापक रामचंद्र तोडकर यांनी सांगितले.महिलांकडून संस्थेला मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादाबद्दल व महिलांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र लोखंडे, अनिल भोसले व द्रोपदा कणसे यांनी आपल्या मनोगतात स्व.हणमंतराव साळुंखे यांच्या कार्याचा गौरव करत तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोडकर सर यांनी केले. व्हा.चेअरमन जालिंदर दबडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर,संचालक,सभासद व महिलांचे आभार व्यक्त केले. 
हनुमान पतसंस्थेचे स्व. हणमंतराव साळुंखे नामकरण
श्री.हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी या पतसंस्थेला स्व. हणमंतराव साळुंखे यांचे नाव देण्याचा ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.हनुमान पतसंस्थेची स्थापना समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांनी केली असून संस्थेच्या प्रगतीत तात्यांचा मोठा वाटा आहे. पतसंस्थेला हणमंतराव साळुंखे यांचे नाव देण्याचा ठरावाचे सर्वांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments