सातारा
गेली तीन वर्ष शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याबाबत आम्ही एकतो आहोत. जर मध्यावधी लागली तर आम्ही निवडणूका लढवायला तयार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोपर्डी प्रकरणावरुन जर सरकारने 1 जानेवारी 2018 पर्यंत कार्यवाही नाही केली तर मी स्वतः रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी सातार्यात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंह भोसले यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुलींना अजूनही महाविद्यालयात येताना जाताना भीती वाटते. त्यांच्याकडून अनेक समस्या समजल्या आहेत. त्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आपली भूमिका काय राहिल या प्रश्नावर त्या म्हणाल्या, सातार्यातून पक्षाने खासदारकीसाठी उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार काय? या प्रश्नावर त्यांनी हात जोडून म्हणाल्या, मी बारामतीतच खूश आहे. मला बारामतीच्या जनतेने दोन वेळा निवडून दिले आहे. 2019 ला पक्षाकडे खासदारकीला तिकीट मागणार आहे, असे सांगत, त्यांनी उदयनराजें चांगले खासदार आहेत. आम्ही लोकसभेत विकासकामांच्या मुद्यावर बोलत असतो. माझ्या मतदारसंघातील प्रश्न विचारा मी उत्तर देते, असे त्यांनी सांगितले. राणे राष्ट्रवादीत येतील काय या प्रश्नांवर त्या म्हणाल्या, तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, माझे वडील जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले होते. तेव्हा 50 आमदारांना घेवून पडले होते, आई गेली तरी पोरं जगतातच अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
कोपर्डी प्रकरणात सरकारला 1 जानेवारीची मुदत
कोपर्डी प्रकरणात मीच पहिले आंदोलन केले. पाठपुरावाही मीच केला आहे. एका महिलेवर अत्याचार होतोय, या घटनेबाबत सरकारकडून जर काहीच होत नसेल तर या सरकारला मी स्वतः 1 जानेवारीपर्यंतची मुदत देत आहे.
शेवटच्या शेतकर्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. कर्जमाफीच्या मुद्यावर येत्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या मुद्यावरुनही त्यांचे पगार वाढले पाहिजे, महागाई किती आहे, त्यांना आमचा पाठींबा आहे, असेही त्यांनी सांगितले.

0 Comments