मायणी
वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठयामुळे त्रस्त झालेल्या मायणी मध्ये गेल्या चार पाच महिन्यापासून काही ग्राहकांना विजबिलेच मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस येत आहे,आणि महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. मायणी व परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून वाढीव बिले येण्याचे सत्र सुरू आहे.
संपूर्ण मायणी विभागामध्ये सहाय्यक अभियंता लोखंडे यांच्या बरोबर प्रत्यक्ष १६ कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या फक्त सात कर्मचारी व एक खाजगी कर्मचारी काम करीत असताना दिसत आहे . या कर्मचाऱ्यांवर भागातील नवीन कनेक्शन ,डिपीतील तांत्रिक बिघाड ,नवीन खांबांची उभारणी दुरुस्ती, वाढीव बिलाची दुरुस्ती थकबाकी वसुली या सारख्या असंख्य समस्यांचा बोजा पडलेला दिसत आहे आणि त्याचा परिणाम ग्राहकांच्या प्रश्न समस्या सोडवण्यावर होत आहे.
मीटर युनिट चे छायाचित्र नसल्याने व वेळेवर बिलाचे वाटप न झाल्याने याच्या दर्जा वर प्रशचिन्ह उपस्थिती होत आहे.वीजबिल वाटण्याचे कंत्राट मीटर रिडींग करणाऱ्या कंपनीला दिले असल्याचे सहायक अभियंता लोखंडे यांनी सांगितले.पण कंत्राट दिल्यापासून एक वेळी ही वीजबिल नियमित वाटली गेली नाहीत,आणि अचानक आलेल्या वाढीव बिलामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे.
कर्मचारी व ग्राहक यांच्यात वाद
महावितरणचे कर्मचारी थकीत वसुलीसाठी फिरत असताना थकीत ग्राहकांची वीजपुरवठा खंडित करीत असताना,चार पाच महिने विजबिलेच आले नसल्याने कर्मचारी व ग्राहक यांच्यात वाद होत आहे.
मोबाईल दाखवून वीजबिल भरा
वाढीव विजबिलासदर्भात व वेळेत विजबिले का मिळत नाही?याची विचारणा कार्यलयात केल्यास,ग्राहकांनी ऑफिस मध्ये येऊन आपला मोबाइल नो. रजिस्टर करावा,व वीजबिल नसेल तर आपला मोबाईल दाखवून वीजबिल भरा.असे आवाहन सहायक अभियंता लोखंडे यांनी केले.

0 Comments