सातारा
प्रेम प्रकरणाच्या कारणावरुन कोंडवे येथे दोन गटात दांडके आणि गजाच्या सहाय्याने मारामारीची घटना दि.27 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या मारामारीमध्ये दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तालुका पोलिसात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 11 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून संशयित सर्वजण फरार झाले आहेत. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कारभारी प्रवीणकुमार जाधव हे सुट्टीवर निघाले होते. परंतु ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांची सुट्टीच रद्द केल्याचे समजते. तसेच या घटनेमुळे कोंडवे गावात सध्या तणावाचे वातावरणही आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नामदेव शंकर इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन चिडून जावून अजय मोहन इंगळे व विशाल इंगळे यांना दि.27 रोजी रात्री 9 वाजता नलवडे आळी येथे योगेश किसन निंबाळकर, गणेश शंकर निंबाळकर, संतोष यदू निंबाळकर, बबलू निंबाळकर, आदिनाथ निंबाळकर यांच्यासह पाच ते सात जणांनी अडवले. त्यांना जाब विचारात दांडके, गजाने मारहाण केली. त्यामध्ये विशाल इंगळे हा जखमी झाला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक स्वराज पाटील हे तपास करत आहेत. तर ऋद्धा निंबाळकर (रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जून्या भांडणाच्या कारणावरुन दि. 27 रोजी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी हणमंत पांडूरंग इंगळे, विशाल उत्तम इंगळे, पिंटू शंकर इंगळे, अमोल उत्तम इंगळेत, प्रमोद मोहन इंगळे, अजय मोहन इंगळे यांनी घरात घुसून शिव्यांची लाखोली वाहत घराची मोडतोड केली. पांडूरंग इंगळे याने पोटात लाथ घातली तर इतरांनी मारहाण केली. हवालदार गोळे तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात तणाव आहे
0 Comments