फलटण तालुक्यातील मिरेवाडी कुसूर येथील सोसायटी संचालक शरद जयराम कोकरे (वय 44) यांचा पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना स्वाईन फ्लू झाला होता. 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उपचारापूर्वी खोकल्याचा त्रास होत असल्याने लोणंद येथील खाजगी रुग्णालयात त्यांनी तपासणी केलि. तेव्हा त्यांना स्वाइन फ्लू ची लागण झाली असल्याचे निदान समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास वाढल्याने शनिवारी दुपारी पुणे येथे हलविण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. शरद कोकरे हे कुसूर वि.से.सोसायटीचे संचालक होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा, पत्नी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे अतिशय हसरा स्वभाव असलेल्या कोकरे यांच्या जाण्याने परिसरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments