अरुण गोडबोले सातारा
सायकल वापरणे हे आपल्या सोयी- गैरसोयीपेक्षा किंवा इतर फायद्यांपेक्षा अप्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले आहे. गावातल्या गावात पाच किलोमीटरपर्यंतचे अंतर कुणालाही सहज सायकलने जाता-येता कापता येते. तेवढ्याने साधारण धडधाकट स्त्री-पुरुषांना काहीही त्रास होत नाही, दमायला होत नाही. वेळही वेगळा जास्त लागत नाही खर्च तर नाहीच नाही. पण सायकलवरून जाण्यात कमीपणा मानला जातो हे खरे. `सायकलींचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात हल्ली सायकल दिसेनाशी झाली आहे. भाडोत्री सायकलींची दुकानेही संपली. रिक्षा किंवा स्कूटरसाठी पन्नास रुपये सहज फेकण्यामुळे सगळयांपुढे अनेक समस्या वाढतात. इतर देश त्या `मागासलेल्या सोयीकडे' पुन्हा वळले आहेत. आपण त्यांच्या तुलनेत जरा जास्तच शहाणे व `पुढारलेले' असल्यामुळे सायकलीच्या खटाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहोत.
आज प्रचंड वेगाने आपली शहरे धावत आहेत. गती म्हणजेच सर्वकाही अशी मानसिकता असताना सायकल हाणत कामाच्या ठिकाणी येणे-जाणे, हे पचनी पडायला अंमळ जडच जाते. वेग पकडण्याशिवाय आपल्या कोणाला गत्यंतर नाही, असेही समजण्याचे कारण नाही. जगातील काही देशांनी या भ्रामक वेगाला आवरायचे मनावर घेतले आहे. आपल्याकडे असे सायकलवरून जा-ये करणे शक्य आहे ना? प्रदूषण, अफाट लोकसंख्या, शहरांची बेबंद वाढ, अकार्यक्षम बससेवा असे प्रश्न इथे उभे आहेत. आपण जणू त्या गावचेच नाही, असे दाखवतो किंवा कुंपणावर बसून टीका तरी करतो. परंतु जगाच्या पाठीवर असे देश आहेत की ज्यांनी अशा व्यामिश्र प्रश्नांवर उतारा शोधण्याबरोबरच वसुंधरेला प्रदूषणापासून वाचवले आहे. शहरी समस्यांच्या त्या मालिकेला उत्तर दिले आहे ते चीन आणि अन्य काही देशांनी.
वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर १९व्या शतकात सुरू झाला. बॅरोन कार्ल व्हॉन ड्न्ेस हे जर्मन गृहस्थ सायकलचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी `रनींग मशीन' चा शोध १८१७ साली लावला. पुढे त्या यंत्राचे स्वामित्वहक्क (पेटंट) घेतले. सायकलचा आकार, रचना, जडणघडण कालानुरूप बदलत गेली. सायकलींचे उत्पादन जगभरात सर्वाधिक करणारा देश असा भारताचा लौकिक आहे. वाहतुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून अनेक देशांनी सायकलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण, वाहतूकीची कोंडी, वाढती लोकसंख्या आणि आक्रसते रस्ते या समस्यांवर सायकलींचा वापर हा पर्याय असल्याने सायकलला नवसंजीवनी मिळालेली आहे.
चीन हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, आता सार्वजनिक वाहतुकीसाठी सायकलींचा वापर करण्याबातही या देशाने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. सायकलींचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी चीनमध्ये सुरू झाला तो २०१५ साली. आधुनिक पद्धतीच्या सायकली तिथे उपलब्ध आहेत. या सायकली विकत घेण्याची गरज नाही. त्या भाड्याने मिळतात, भाडेसुद्धा अत्यल्प. सायकल ज्या ठिकाणाहून घेतली तिथेच परत केली पाहिजे असेही नाही. चीन सरकारने खास सायकलींसाठी मार्गिका (ट्न्ॅक) बनवल्या आहेत. सायकली भाड्याने देण्याची सुरुवात चीनमध्ये `ओफो' या कंपनीने केली. कंपनीच्या पिवळया रंगाच्या तब्बल अडीच लाख भाडोत्री सायकली आहेत. चीनमधील एकूण ५० शहरांमध्ये ही सेवा पुरवितात. `मोबाईक' नावाची दुसरी कंपनी. आता अनेक कंपन्या आहेत, विविध रंगाच्या सायकलींमुळे चिनी रस्त्यांवर इंद्रधनुष्य अवतरले आहे, असा भास होतो.
चीनमध्ये ७.५३ लाख इतक्या भाडोत्री सायकली आहेत. सायकली उत्तम प्रकारे वापरता याव्यात अशा सुविधा युरोपमध्ये चांगल्या प्रकारे निर्माण केल्या आहेत. फ्रान्स(४३ हजार), स्पेन (२५हजार) हे देशही भाडोत्री सायकलींत -लोकसंख्येच्या मानाने, आघाडीवर आहेत. पॅरिसमध्ये सार्वजनिक सायकलींना `वेल्ब' म्हणतात. पहिल्या अर्धा तासासाठी सायकल मोफत दिली जाते. नंतर दर अर्ध्या तासासाठी एक युरो. एक दिवसाचा पासदेखील मिळतो. दिवसाला एक युरो, आठवड्याला पाच युरो आणि संपूर्ण वर्षासाठी २९ युरो याप्रमाणे तिथे दरआकारणी केली जाते. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये सायकलींचा वापर सर्वाधिक होतो. पर्यटकांप्रमाणेच निवासी नागरिकांचा भरही सायकल वापरण्यावरच आहे. सायकली वापरण्याबाबत नागरिकांना अनेक पर्याय आहेत. ब्रिटनमध्ये सायकल हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून प्रभावीपणे वापरले जाते. तिथे सायककलींची गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे. लंडनस्थित डरपींरपवशी उूलश्रशी या कंपनीच्या ११ हजार सायकली आहेत. तिथे पहिला अर्धा तास विनाशुल्क; मग पुढच्या प्रत्येक अर्ध्या तासासाठी दोन पाउंड शुल्क आहे.
२००१ साली जगातील मोजक्या चार शहरांमध्येच सार्वजनिक वाहतुकीसाठी सायकली वापरल्या जात. २०१४ सालादरम्यान तीच संख्या ८५० वर... आता २०१६ साली काही हजार शहरांत सायकली फिरतात.
एका नवीन पर्वाची ही सुरुवात आहे. भारतीय लोक इतर जगातल्याप्रमाणे `मागासलेले' कधी होणार?

0 Comments