वडूज/प्रतिनिधी : खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या मायणी ग्रामपंचायतीवर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखालील मातोश्री सरूताई विकास पॅनेलने सरपंचपदासह दहा जागा जिंकत ऐतिहासिक सत्तांतर घडविले. येथील विरोधी सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखालील स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे ग्रामविकास पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले. ललगुण ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे व भाजपाचे हणमंतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ललगुण ग्रामविकास आघाडीने सत्ता कायम ठेवली. उपसभापती कैलास घाडगे यांना परिवर्तन करण्यात अपयश आले. म्हासुर्णे येथे माजी उपसरपंच सचिन माने यांनी पंचरंगी लढतीत आपले वर्चस्व कायम ठेवले. होळीचागाव येथे सरपंचपदासह आठही जागा जिंकत माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब लादे यांनी आपली गावावरील पकड कायम ठेवली.
मायणी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरूताई विकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार सचिन गुदगे यांनी 3 हजार 761 मते मिळवून विजय मिळविला. सरूताई विकास पॅनेलचे सुरज पाटील, अश्विनी माळी, आशाताई माने, विद्या काबुगडे, विजय कवडे, भारती देशमुख, आनंदराव शेवाळे, जगन्नाथ भिसे, मंदिरा झोडगे, उषा पाटोळे हे नऊ उमेदवार विजयी झाले. सत्ताधारी स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे ग्रामविकास पॅनेलला रणजित माने, विनोद पवार, गजानन माळी, पापालाल नदाफ, वैशाली पवार, अर्चना जाधव, मनिषा श्रीखंडे या सात जागांवर समाधान मानावे लागले.
गोरेगाव (निमसोड)ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांची निवड बिनविरोध झाली होती. तर सरपंचपदाच्या निवडणूकीत सुशिलकुमार डोईफोडे यांनी 366 मते मिळवून विरोधी विक्रम डोईफोडे यांचा पराभव केला. म्हासुर्णे येथे सचिन माने यांनी 1 हजार 184 मते मिळवित सरपंच पद पटकविले. याठिकाणी सुहास माने, सिकंदर मुल्ला, नलिनी कुलकर्णी, तृप्ती थोरात, गुलाब वायदंडे, आबासाहेब यमगर, वंदना माने, विठ्ठल दबडे, सिताबाई माने विजयी झाले. याच ग्रामपंचायतीत तुषार माने व अन्य तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ललगुण येथे मानाजी घाडगे, हणमंतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार जयवंत तुकाराम गोसावी यांच्यासह दिपक भोसले, प्रियांका शिरतोडे, निखील घाडगे, रोहिणी जितेंद्र घाडगे हे पाच जण निवडून आले. तर विरोधी कैलास घाडगे यांच्या ज्योतिर्लींग पॅनेलचे कल्याणी घाडगे, विकास गार्डे, सुधिर घाडगे, निता केंजळे, रोहिणी कैलास घाडगे हे पाच उमेदवार निवडून आले.खातवळ येथे शिवसेनेचे सत्यवान कांबळे, अॅड. गजानन फडतरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या रेखा सुनिल फडतरे या 555 मते मिळवून सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या. तर सत्ताधारी शंकरराव फडतरे यांचे उमेदवार चार जागांवर विजयी झाले. विजयी उमेदवारांत सुनिता महामुनी, महादेव अहिवळे, सतिश महाजन, नंदाताई फडतरे, सागर मदने, जयश्री फडतरे, सुभद्रा फडतरे यांचा समावेश आहे. राजाचे कुर्ले येथील ग्रामपंचायत निवडणूकीत बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल माने, अॅड. संग्रामसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सरपंच पदासह सर्व 12 जागा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. याठिकाणी सरपंच पदासाठी समरजीत राजेभोसले 1 हजार 148 मते मिळवून विजयी झाले. अन्य विजयी उमेदवारांत किशोर माने, अरूणा माने, अनिल खरात, आशा माने, हिंदुराव माने, शंकर घोरपडे, शुभांगी माने, सविता जगताप, सुजाता शेडगे, शिवाजी उमापे, यांचा समावेश आहे. होळीचा गाव येथे अविनाश वसंत शिंदे यांनी 396 मते मिळवून सरपंच पदी विजय मिळविला. अन्य विजयी उमेदवारांत राजेंद्र खाडे, छाया देशमुख, धनंजय माळवे, मंगल शिंदे, संजय होवाळे, रेश्मा मोहिते, प्रीती शिंदे यांचा समावेश आहे. मुसांडवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरपंचपदाच्या चौरंगी लढतीत अनुसया प्रभाकर जगताप यांनी 169 मते मिळवून विजय मिळविला. अन्य विजयी उमेदवारांत भगवान जगताप, शितल जगताप, असिफ पटेल, जमुना मोरे, दाऊद पटेल, राधाबाई पाटोळे, फैमिदा पटेल यांचा समावेश आहे.
नागनाथवाडी येथे सोनाली शिवाजी फडतरे यांनी सरपंचपदासाठी 253 मते मिळवत विजय मिळविला. याच पॅनेलचे प्रविण घाडगे, संतोष घाडगे, विमल घाडगे, कमल गुरव, हे उमेदवार विजयी झाले. त्रिमली येथील सरपंचपदी जयश्री रामचंद्र येवले यांची 270 मतांनी निवड झाली आहे. सदस्यपदी लक्ष्मी भोसले, अरूणा येवले यांच्या निवडी झाल्या आहेत. लांडेवाडी येथील सरपंचपदी अलका प्रल्हाद सुर्यवंशी यांची 243 मतांनी सरपंच पदी निवड झाली. रविंद्र सुर्यवंशी, शिवाजी सुर्यवंशी यांची सदस्यपदी निवड झाली. गिरीजाशंकर वाडी येथील सरपंच पदाच्या तिरंगी लढतीत सुमन सुनिल थोरवे यांनी 318 मते मिळवत विजय मिळविला. शिंदेवाडी येथे तानाजी एकनाथ फाळके यांची 253 मतांनी सरपंचपदी निवड झाली. याठिकाणी सुनिल फाळके, रणजित माने, सुनिता नलवडे, रंजना फाळके, सुवर्णा फाळके यांची सदस्यपदी निवड झाली आहे.

0 Comments