रविंद्र पवार याचा सत्कार करतेवेळी प्राचार्य काकडे म्हेत्रे गेजगे आदी
म्हसवड (धनंजय पानसांडे )
मे २०१७ मध्ये झालेल्या मुक्त विद्यापीठाच्या बी ए च्या परिक्षेत १७ विषय घेवून पहिल्या प्रयत्नात ६७ टक्के गुण मिळवणारे माळशिरस पंचायत समितीचे ४५ वर्षीय ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार यांनी दैदीप्यमान यश मिळवले. याबदल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे केंद्र संयोजक प्राचार्य अरूण काकडे सह केंद्र सहायक अमोल म्हेत्रे यांनी पवार याचे कौतुक केले आणि प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही केला.
म्हसवड येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शाखा सिध्दनाथ हायस्कुल व ज्युनि. कॉलेज मध्ये मुक्त विद्यापीठाच्या पूर्व तयारी परिक्षेचा अॅडमिशन फॉर्म २०१४ मध्ये भरून अॅडमिशन घेतले होते. माञ नोकरी मुळे पवार याना परिक्षेला बसता आले नाही पुन्हा २०१५ मध्ये त्याच परीक्षेसाठी अॅडमिशन घेतले त्याही वेळी अडचणी आल्याने परिक्षेला बसले नाही अशा प्रकारे २०१४ ते २०१६ या तीन वर्षात पवार फक्त मुक्त विद्यापीठात पैसे भरून अॅडमिशन घेत होते. परिक्षा आली की ते परत म्हसवडच्या मुक्त विद्यापीठाकडे नापास होण्याच्या भिती पाट फिरकत होते पुन्हा मे २०१७ मध्ये अॅडमिशन घेण्यास आले तेव्हा मुक्त विद्यापीठाचे केंद्र सहाय्यक अमोल म्हेञे यांनी रवींद्र पवार यांना बोलवून त्याची समजुत काढत दरवर्षी अॅडमिशन घेता माञ परिक्षेला बसत नसल्याने पैसे का वाया घालवता त्यापेक्षा अभ्यास करा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल यशस्वी होण्याच्या काही गोष्टी काही माहिती सांगीतली आणी काय गेले चार वर्षे नापास होत आसलेले ग्रामसेवक रविंद्र पवार चार वर्षाचे एकुण १८ विषय घेऊन मे २०१७ मध्ये झालेल्या मुक्त विद्यापीठाच्या परिक्षेत केंद्र सहायक म्हेञे यांच्या टिप्स लक्षात घेवुन रवींद्र पवार चक्क १८ च्या१८ विषयात पास झाले या बद्ल मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक व प्राचार्य अरूण काकडे विठ्ठल गेजगे अमोल म्हेञे यानी रविंद्र पवार यांनी त्याचा प्रमाण पञ देवून सत्कार केला

0 Comments