छायाचित्र - विरकरवाडी ते म्हसवड या रस्त्याची झालेली दुरवस्था
म्हसवड (धनंजय पानसांडे)
माण तालुक्यातील विरकरवाडी ते म्हसवड या चार किमी च्या रस्त्याची अवस्था ' खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ' अशी झाली असुन या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्ड्याच्या साम्राज्यामुळे रस्ता शोधावा लागत असुन वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असुन रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी वाहन धारकांमधून होत आहे .
माण तालुक्यातील विरकरवाडी ते म्हसवड या चार किमी च्या रस्त्याची अवस्था ' खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ' अशी झाली असुन या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्ड्याच्या साम्राज्यामुळे रस्ता शोधावा लागत असुन वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असुन रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी वाहन धारकांमधून होत आहे .
विरकरवाडी हे गाव म्हसवड नगरपालिका हद्दीतील सर्वात मोठे खेडेगाव म्हणून ओळखले जाते या गावातून म्हसवड - आटपाडी या रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. गेल्या 20 वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते ते ही निकृष्ठ दर्जाचे होते. तेव्हा पासुन या रस्त्याचे काम झाले नसुन फक्त काही वेळा मलमपट्टी केली आहे , त्यामुळे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य झाले असुन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे , रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने एक-दोन फुटाचे खड्डे पडले आहेत , रस्त्याची अवस्था 'खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ' या चार किलोमीटरच्या रस्तावरून मोटारसायकल वरून प्रवास करण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागत आहेत , रस्त्याची एवढी भयानक अवस्था असतानाही बांधकाम विभाग मूग गिळून गप्प आहे , तसेच एरवी मते द्या म्हणून निवडणूका आल्या कि जोगवा मागणारे हंगामी लोकप्रतिनिधी सध्या गायब झाले असुन त्यांच्या कडुन दुर्लक्ष होत आहे . येथे खड्डा मुळे छोटे-मोठे अपघात झाले असुन खड्डे चुकवण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे , ह्या गावात मोठ-मोठे राजकारणी मात्र 'तेरी भी चूप मेरी भी चुप ' च्या भुमीकेत आहेत . त्यामुळे गाव सारा पुढारयांचा मात्र एक नाही कामाचा अशीच परिस्थिती आहे.
या गावातील लोक बॅका , शाळा , सरकारी दवाखाना , पतसंस्था , पशुवैद्यकिय दवाखाना , व अन्य शासकीय कार्यालयाच्या कामासाठी त्याचबरोबर म्हसवड येथे मोठी बाजारपेठ आहे ,आशा सर्व कामासाठी येथील अनेक गावांचा म्हसवड गावाशी नियमीत संपर्क असतो त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते , त्यामुळे वाहनधारकां मधून रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी होत असुन आता तरी बांधकाम विभाग ह्या कडे लक्ष देणार का ? हा येणारा काळच ठरवेल .
रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी .
विरकरवाडी गावातुन म्हसवड रोडला जोडला जाणाऱ्यां मुख्य रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे पडले असुन त्यात पावसाचे पाणी साचले आहे , वाहन चालविताना ह्या खड्ड्या मुळे अडचण येत असुन हे अंतर कापण्यासाठी जास्त वेळ लागत आहे त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी .
श्री शंकर गलंडे (सेवा निवृत्त पोलिस इन्स्पेक्टर), वाहनधारक , विरकरवाडी

0 Comments