सातारा
सातारा शहराची मातृसंस्था असलेल्या सातारा नगरपालिकेच्या परिसरात विविध दुकाने थाटली जात असल्याने हा परिसर सध्या शॉपिंग झोन बनू लागला आहे. यामुळे परिसरातील पार्किंगही वाढले आहे.
पालिकेच्या समोर कायमस्वरुपी काही वस्तुंच्या विक्रीचे स्टॉल लावले जातात. कधी कापड विक्री, कधी कोणत्या वाहनांची विक्री, कधी वॉटर प्युरिफायर असो किंवा अन्य काही वस्तुंच्या विक्रीचे स्टॉल लागलेले असतात. आधीच पालिकेच्या तळमजल्यावर शॉपिंग सेंटर आहे. शिवाय बाहेर हे स्टॉल. पालिकेत कामकाजासाठी येणार्या नागरिकांची सतत वर्दळ असतेच आणि राजपथही नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो. येथे येणारे नागरिक अस्ताव्यस्त पार्किंग करतात. पालिकेच्या दारासमोरच येणार्या नेत्यांच्या चारचाकी गाड्याही उभ्या असतात. परिणामी या परिसरातील वर्दळ वाढली असून अनेक वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. शॉपिंंग सेंटर किवा अन्य स्टॉलधारकांकडून पालिकेला भलेही उत्पन्न मिळत असेल पण पालिकेसमोर तयार होत असलेला शॉपिंग झोन भविष्यात धोकादायक ठरू शकतो.

0 Comments