Hot Posts

6/recent/ticker-posts

संदीप महाडीक यांच्या प्रयत्नाने पथदिव्यांची कामे मार्गी







दहिवडी येथील 28 वाड्या वस्त्यावरील पथदिवे लावण्याची पथ उर्जिकरण योजना व नवीन 5 रोहित्रे संदीप महाडीक यांच्या प्रयत्नाने मार्गी लागली असून आता ती अंतिम टप्प्यात आहेत.
दहिवडी, ता. माण येथील 28 वाड्या वस्त्यांवरील रस्त्यावरील पथदिप उर्जीकरण (स्ट्रीट लाईट) लावण्यासाठी व 5 रोहित्रे बसवण्यासाठी माजी सरपंच अर्चना संदीप महाडीक यांच्या सरपंचकीच्या काळामध्ये दि. 2 ऑक्टोबर 2015 रोजी ठराव केला व ग्रामपंचायतीने तो प्रस्ताव करुन दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजी वीज कंपनीकडे सादर केला. संदीप महाडीक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांनी ऊर्जामंत्री  चंद्रशेखर बानवकुळे यांच्याकडून याकामासाठी डी.पी.डी. तून 44 लाख 80 हजार 720 रुपये मंजूर करुन ही योजना मार्गी लावली आहे.
या योजनेअंतर्गत सरकारी दवाखाना समोर, गोसावी वस्ती, शिर्केवस्ती, दरेकर वस्ती, शिंदे मळा, पंचायत समिती वसाहत कटपाळे वस्ती, शिंदेनगर, जाधव वस्ती, समर्थनगर, शिंदे नगर परिसर, दहिवडी महाविद्यालय, एम.एस.ई.बी. पाठीमागील परिसर, कुदळेवस्ती, भटकी मळा, चैतन्य नगर, एस.टी कॉलनी परिसर खताळवस्ती, धनाजी जगदाळे वस्ती, भवानवाडी, शामराव नाळे वस्ती, खालचा रानमळा, भोसले वस्ती, साळुंखे वस्ती, खरात वस्ती, सपकाळ वस्ती, मुळीक वस्ती, पोलीस वसाहत परिसर, तानाजी नारायण जाधव वस्ती, धनाजी जगन्नाथ पोळ वस्ती, तुपेवाडी, आंधळी पुर्नवसन (बिदालरोड) या 28 वाड्यावस्त्यांसाठी 4 लाख 5 हजार 576 रुपयांचे दिवे मंजुर झाले असून नवीन 5 रोहित्र दहिवडी गोंदवले रोड-2, दहिवडी तुपेवाडी रस्ता कॉलेज परिसर-1, दहिवडी भटकी मळा रस्ता-1, दहिवडी बिदालरोड - 1, रोहित्रे मंजूर होवून या कामासाठी 40 लाख 75 हजार 144 रुपये येवढा निधी मंजूर होऊन काम अंतिम टप्प्यात आहे. दहिवडीतील नागरिकांच्याकडून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर व संदीप महाडीक यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments