Hot Posts

6/recent/ticker-posts

मायणी येथे औषध फवारणीसंदर्भात शेतकऱ्यांची जनजागृती चर्चा व परिसंवाद उत्साहात

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी गोंडे साहेब व उपस्तिथ प्रगतशील शेतकरी संजय गुदगे,मायनीतील कृषी सेवा केंद्राचे प्रमुख घोणे व माने 
मायणी:-
        शेतकऱ्यांच्या औषध फवारणी सुरक्षेसंदर्भात,घ्यावयाची काळजी व उपाययोजना यासंदर्भात सातारा कृषी विभाग,बी ए एस एफ कंपनी व मायणी कृषी औषध असो.यांच्या संयुक्त विद्यमाने या  
चर्चासत्राचे आयोजन विठोबा मंगल कार्यालयात  करण्यात आले होते.यावेळी कृषी अधिकारी गोंडे,प्रगतशील शेतकरी संजय गुदगे,कृषी सेवा केंद्राचे माने उपस्तिथ होते
              या कार्यक्रमाच्या आरंभी कृषिअधिकारी गोंडे म्हणाले की,औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे,त्यामध्ये हलगरिजीपणा झाल्यास त्याची मोठी इजा शेतकऱ्यास होते.अधिकृत अश्याच कृषी सेवा केंद्रातून औषधाची खरेदी करावी,तसेच पक्के बिल,हातळणाची पद्धत याकडे लक्ष वेधले पाहिजे.तसेच जि. प माध्यमातून मिळणाऱ्या अनेक योजनांची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली.त्यानंतर बी ए एस एफ कंपनी द्वारे विविध चित्रफितीतून औषध फवारणीसंदर्भांत माहिती व घ्यावयाची काळजी ,प्रथमोपचार,औषध फवारणी करीत असताना लागणारे साहित्य याची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमास मायणी व परिसरातील शेतकरी,मायनीतील कृषी औषध विक्रेते व ग्रामस्थ उपस्तिथ होते.
            इजा होण्याअगोदर प्रतिबंध केला पाहिजे हे या चर्चा सत्राचे मूळ आहे अशी भावना येथील उपस्तिथ शेतकऱ्यांनि व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments