कलेढोण : नागेश चौधरी
कलेढोण ता खटाव येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले यांच्या जन्मभूमीचा वारसा असलेल्या कलेढोण नगरीला विविध समस्यांनी घेरले असून बेजबाबदार लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा गोंधळ कारभारामुळे गावच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस कमी होत आहे
सन 1983 रोजी मंजूर केलेल्या या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा होता . पण आता या रुग्णालयात पाण्याची गैरसोय व त्यातच कर्मचाऱ्यांच्या लहरी कारभारामुळे आरोग्य सुविधांचा दर्जा घसरला आहे
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचाही धाक राहिला नाही , वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध राहत नाही त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होतेय , रुग्णालयातील कर्मचारी अपडाऊन करतात त्यामुळे आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत , एवढे मोठे रुग्णालय असून हि गावातील लोक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जात आहेत .

गावातील नवचैतन्य सामाजीक ग्रुप चे काही तरुण युवकानी रुग्णालयाची पाहणी केली असता फक्त हजेरी पत्रकावर कर्मचारी उपस्थित होते , प्रत्यक्षात कमी कर्मचारी रुग्णालयात हजर होते असे दिसून आले , युवकांनी बायोमेट्रिक हजेरी पत्रकाची महिन्याचे रेकॉर्ड पाहिले असता त्यात काही कर्मचारी महिन्यातून चार ते पाच दिवस च उपस्थित असल्याचे आढळून आले , तसेच युवकांना हजेरी पत्रकावर बोगस सह्यांचा कारनामा दिसून आला , यावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बेधुंद पणा उघड जहाला, रुग्णालयाची यंत्र सामग्री जुनी व नादुरुस्त अवस्थेत आहे , रुग्णालयाची सुरक्षाभिंती ची ठिकठिकाणी पडझड़ झाली आहे त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे , रुग्णालय परिसरात अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थाने असून त्याचीही डागडुजी करणे गरजेचे आहे , तसेच कलेढोण भागात अनेक गावे वाड्या वस्त्या आहेत त्यासाठी 108 या नंबर ची रुग्णवाहिका ची गरज आहे त्यामुळे रुग्णाचे हाल होणार नाहीत .
तसेच प्रमुख अधिकारि असलेले जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या रुग्णालयाची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांतून होत आहे

0 Comments