Hot Posts

6/recent/ticker-posts

सोशल मीडियावर एक्झिट पोलची टूम, कोण होतोय सरपंच तर कोण होतोय आमदार-खासदार


सध्या सर्वांच्या हाती असलेले एक महत्त्वाचे शस्त्र आहे. ते म्हणजे सोशल मीडिया. या सोशल मीडियाने अनेकांना रात्रीतून हिरो केले तर काहींना आयुष्यातून उठवले देखील. याच सोशल मीडियावर सध्या सर्वेक्षणाची टूम निघाली असून या सर्वेत राजकीय सर्वेक्षणाला जास्त पसंती असून या ऑनलाईन सर्वेतून काहीजण सरपंच झाले आहेत तर काहीजण आमदार/खासदारही झाले आहेत.
कुठल्या तरी कंपनीने सर्वेक्षणाची एक लिंक दिली असून त्यावर कोणीही एखादा प्रश्‍न तयार करून सर्वे करू शकतो. यामध्ये एक प्रश्‍न द्यायचा त्याच्या पर्यायाची चार उत्तरे द्यायची आणि ती लिंक व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर शेअर करायची. हे सर्वेक्षण संगणकीय असल्यामुळे केवळ 3 मते नोंद झाली तरी त्याची टक्केवारी जाहीर होऊन निकाल हाती येत आहे.
सध्या जिल्ह्यात गावोगावी ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणाला जोर आला आहेत. व्हॉट्स अ‍ॅपवर एखाद्या पक्षाचे, गटाचे, व्यक्तीचे समर्थन करणारे लोक असतात. किंवा फेसबुकवरही अशाच स्वरुपाची पेज असतात. त्यावरून हे सर्वेक्षणाची लिंक दिली जात असून सर्वेद्वारे कोण सरपंच होणार, कोण आमदार होणार असे प्रश्‍न विचारले जात आहेत. त्यातून या चाचण्यांचे निष्कर्ष काढले जात असून अनेजण सरपंच म्हणून विजयीही झाले आहेत.

हास्यास्पद कल चाचण्या
खरंतर भारतासारख्या देशात लोकशाही आहे. अशा सर्वेतून कोणी विजयी होत असते तर निवडणुका कशाला घ्याव्या लागल्या असत्या. अनेकदा मतदानपूर्व चाचण्यांमधले अंदाजही चुकले असताना या सर्वेंमुळे अनेकांना गुदगुल्या होत आहेत. आणि ग्रुपमधल्या 256 आणि पेजवरच्या 5-÷10 हजार लोकांच्या मतांवर जर आमदार, खासदार, सरपंच ठरणार असतील तर यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही, असे माध्यम तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शिवाय फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर असणारे लोक त्याच गावचे किंवा त्याच मतदारसंघातील असतील असेही नाही. त्यामुळे या सर्वेला काहीच अर्थ नाही.

कॉपी, पेस्ट अन् फॉरवर्ड कधी थांबणार
सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला तर ती मोठी ताकद आहे. परंतु, आलेली गोष्ट कॉपी पेस्ट करून फॉरवर्ड करण्याची पद्धत बंद व्हायला हवीत. याच सोशल मीडियाने अनेकांना जीवदान देखील दिले आहे तर अनेकांना जिवंतपणीच मृत्यूही दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हायला हवा. 

Post a Comment

0 Comments