Ticker

6/recent/ticker-posts

एम आय डी सी बद्दल सदाभाऊकडे गाऱ्हाणे, वडी कळंबी थोरवेवाडी गावे वगळण्याच्या सुचना


सातारा 
 वडी आणि कळंबी गावाच्या पश्चिमेला नियोजित एम आय डी सी ला ग्रामस्थांनी  ग्रामसभेत कडाडून विरोध केला आहेच. शिवाय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सातारा येथे भेट घेऊन ग्रामस्थांनी एम आय डी सी बद्दल गार्हाणे मांडले. त्यांनीही वडी, कळंबी, थोरवेवाडी आदी गावे प्रस्तावित आराखड्यातून वगळण्यात यावीत अशी सूचना  संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आज मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.
एम आय डी सी बद्दल जमीन संपादनासाठी संबंधित ग्रामपंचायतीस पत्रे आल्याने लोकांच्यामध्ये खळबळ उडाली होती. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न चर्चेत आहे. मात्र लोकांच्या प्रखर विरोधामुळे मधल्या काळात त्यांच्यावर पडदा पडला होता. परंतु ऐन दिवाळीत एम आय डी सी चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वडी कळंबी थोरवेवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी एम आय डी सी विरोधात पुन्हा विरोध करण्यासाठी ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून औद्योगिक विकास करण्याच्या धोरणास विरोध दर्शविला आहे. एम आय डी सी प्रश्नांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, एम आय डी सी भुसंपादन अधिकारी अशोक चव्हाण, वडी, कळंबी, थोरवेवाडी, नागझरी, आर्वी, वाठार साठेवाडी आदी गावातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री खोत यांनी बैठकीत प्रत्येक गावातील ग्रामस्थांची एम आय डी सी बद्दल मते ऐकून घेतली. लोकांनी देखील या प्रस्तावीत प्रकल्पाला विरोध करीत. जमीन संपादन करण्यास नकार दिला. शेतकऱ्यांच्या भावना ऐकून त्यांनी वडी कळंबी थोरवेवाडी आदी गावे प्रस्तावित आराखड्यातून वगळण्यात यावीत असे आदेश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच उर्वरित गावे या आराखड्यातून वगळण्यासाठी मंत्रालयात बैठक लावण्यात येणार असल्याचे सांगितले. संबंधित गावातील ग्रामस्थांनी ठराव सह्याचे निवेदन घेऊन बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments