सातारा : जेंव्हा वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली नव्हती, तेंव्हापासून माणसाच्या आरोग्याची काळजी निसर्ग घेत होता, याची प्रचिती प्राचीन काळापासून येत आहे. यामध्ये वन औषधी मिश्रण करून त्याचा ढोस-अर्क विविध आजारांवर जालीम उपाय म्हणून वैदू देत असत. आयुर्वेदात याचे दाखले मिळतात. पण हे वैदू काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. या वैदूंचा संमेलन भरवून त्यांची उपयुक्तता संग्रहित आणि जतन करण्याचे काम वॅन विभागाने सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून दि. 31 ऑक्टोबर रोजी वॅन भवनात संमेलन आयोजित करण्यात आले असून हे देशातील पहिले संमेलन असल्याची माहिती देण्यात आली.
याबाबत पत्रकारांनाही बोलताना उपवनसंरक्षक अनिल अंजनकार म्हणाले, जिल्ह्यातील पाटण, मश्वर, जावळी, सातारा कराड, वाई या भागात मोठ्या प्रमाणात वन औषधी आहेत. या वनाऔषधांमुळे अनेक नामांकित वैदू रुग्णांना बरे करण्यात यशस्वी ठरले आहेत. पूर्वी राजेशाही असताना राजाश्रय असलेले वैदू हिते, पण काळाच्या ओघात त्यांची नैसर्गिक कला लोप पावली. त्याची जागा आजीच्या बटव्याने घेतली असली तरी सध्या आतित्वात असलेल्या वनाऔषधी व त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे गुणात्मक फायदे याचा संग्रह करून ही कला व्यापक दृष्टीने जतन करावी या उद्देशाने हे वैदू संमेलन होत आहे.
बदलत्या अन्न घटकामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार, अंगदुखी, अंधत्व, लकवा, वॉर्डवय आशा असंख्य आजारांमुळे लोक त्रस्त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील महागडी उपचार पद्धती व त्याचा प्रादुर्भाव वाढू लागलरला आहे. त्यामुळे देशी उपचार पद्धती सध्या लोकप्रिय नव्हे तर गुणात्मक दृष्ट्या यशस्वी ठरलेली आहे. याचे कश्रेय खऱ्या अर्थाने आदिवासी व कड्या कपारीत व दुर्गम भागात हिंडून जाडीबुटी व वनाऔषधी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या वैदूचे आहे. अशा वैदूच्या बुद्धी व अनुभवाचा फायदा तसेच त्याच्या गुणवत्तेचे संकलीकरण भावी पिढीला मार्गदर्शक ठरणार असल्याने या संमेलनाला प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व निर्माण झाले आहे. सध्या वाढत्या शहरीकरणामुळे आजारपणाच्या संख्या वाढली असून शहरी भागात वैदूची संख्या वाढत असून ही कला खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातून उदयास आली आहे. त्यामुळे आजही कावीळ, पोटदुखी, गुडघे दुःखी व इतर आजारांसाठी अशा वैदूंकडे सुशिक्षित वर्ग सुद्धा भरोसा ठेवत आहे. ही कला जतन करून पुढच्या पिढीला हा वारसा लाभला यासाठी देशातील पहिले वैदू संमेलन साताऱ्याच्या भूमीत होत असून नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. करण 300 ते 500 पारंपरिक वैदूंचा सहभाग असणार असल्याचे एस. बी. चव्हाण यांनी दिली. सकाळी 11 ते दु. 2 या कालावधी मध्ये हे वैदू संमेलन साताऱ्यातील वन भवनात पार पडणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. या संमेलनामध्ये अनेक नामांकित वैद्यकीय कहेत्रातील पदवीधर मंडळीसुद्धा अभ्यासासाठी सहभागी होतील, असे नामांकित डॉक्टरांनी स्पष्ट केले.
0 Comments