Hot Posts

6/recent/ticker-posts

कास अवैध बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल


कास परिसरातील १३ अवैध बांधकाम धारकांंवर महसुलकडून गुन्हे दाखल करण्यात करण्यात आल्याची माहिती तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली. दरम्यान पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता अवैध बांधकाम धारकांंवर कायदेशीर फास आवळण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास परिसरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट झाला होता. याबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. ना. शिवतारेंनी चार महिन्यांपूर्वी या भागाची पाहणी करून या धनदांडग्यांच्या मुजोरीला लगाम घालण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. तदनंतर प्रशासनाने कारवाईचे कागदीघोडे नाचवले. प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी सुमारे ३० बांधकामधारक न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने फटकरल्यावरही प्रशासन गप्प होते. दरम्यान कास रस्ता खचल्यानंतर दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला पळवून लावल्याने ग्रामीण-डोंगरी भागातील नागरिकांना त्रास होत असल्याने पत्रकारांनी आक्रमक होत पालकमंत्र्यांना धारेवर धरल्यावर ना. शिवतारेंनी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडेबोल सुनवत कारवाई करण्याचे आदेश देताना कासप्रकरणी विचारणा केली होती. पालकमंत्री शिवतारे शनिवार, ता. २८ रोजी नियोजन समितीची बैठक असल्याने साताऱ्यात आहेत. त्यापूर्वीच १३ अवैध बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
आराखडा मंजूर झाल्यानंतर सर्व बांधकामांची पाहणी करून कारवाई
जय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या काँजरवेटीव समितीकडून नगरविकास खात्याकडे कास, सडावाघापूर आणि चाळकेवाडी या भागातील बांधकामांबाबत आराखडा मंजुरीसाठी अंतिम टप्यात आहे. हा आराखडा मंजूर झाल्यानंतर सर्व बांधकामांची पाहणी करून कारवाई केली जाईल.
 - डॉ. स्वाती देशमुख, प्रांताधिकारी

Post a Comment

0 Comments