Hot Posts

6/recent/ticker-posts

अनिश जाधवची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


म्हसवड-वार्ताहर 
 अनिश अनिल जाधव या विद्यार्थीने दिनांक  24 -आक्टोंबर रोजी ता.खटाव येथे पार पडलेल्या  विभागीय सिकई मार्शल आर्ट या शालेय स्पर्धत   41 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे .   ही स्पर्धा  सनशाईन इंग्लिश मिडीयम स्कुल खटाव या ठिकाणी संपन्न झाल्या .त्यामध्ये सातारा , सांगली , कोल्हापूर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग   या 5  जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.   41 किलो वाजनगटात चि. अनिश अनिल जाधव .इ . सातवी मधील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज वडूज , तालुका खटाव , जिल्हा सातारा या विद्यालयाच्या  खेळाडूची विभागीयस्तरामध्ये प्रथम क्रमांक मिळवून दिनांक 30 व 31 ऑक्टोबर 2017 रोजी नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  निवड झाली आहे . 
त्याला विद्यालयाचे प्राचार्य श्री ए . टी. काळे सर, क्रीडामार्गदर्शक श्री  जयवंत गोडसे सर ,क्रीडाशिक्षक श्री एम. एम. घार्गे सर ,श्री जगदाळे सर  यांचे मार्गदर्शन लाभले.  चि. अनिशचे पालक ज्ञानवर्धिनी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज म्हसवड येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत यांचेही त्यास मार्गदर्शन मिळाले . या यशाबद्दल अनिशचे सर्व स्तरातून  कौतुक असून त्याला  पुढील  स्पर्धेसाठी आणि त्याच्या  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

Post a Comment

0 Comments