म्हसवड / प्रतिनिधी
म्हसवड येथील सिध्दनाथ हाय.व ज्युनियर काॅलेज म्हसवड येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करूण ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन भरवण्यात आले याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
डाॅ .ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी उपमुख्याध्यापक सुधिर अहिवळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले मुख्याध्यापक अरूण काकडे दत्तात्रय माने विजय गायकवाड उपस्थित होते या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्या. अरूण काकडे म्हणाले आयुष्य बदलण्यासाठी वाचन हेच माध्यम उपयुक्त आसुन म. गांधी डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद गौतम बुद्ध यांच्या ग्रंथाचे त्याच प्रमाणे मराठी विश्वकोशाच्या सर्व खंडाचे संदर्भ ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले आसुन याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक काकडे यांनी केले
यावेळी सुधिर अहिवळे म्हणाले तरूणांना ग्रंथाचे महत्व समाजेव या तुन प्रेरणा मिळावी यासाठी हा वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे असे अहिवळे म्हणाले
यावेळी आडीच हजार मुलांनकडुन सामुदायिक वाचन करून प्राची उबाळे या विद्यर्थीनीने वाचाल तर वाचाल या विषयी महत्व सांगीतले या वेळी ग्रंथपाल भारत पिसे संतोष देशमुख प्रदिप भोते राजीव कांबळे आदीनी सहभाग घेतला.
0 Comments