म्हसवड दि. २६
कंपनीचे काम शेखर गोरे यांना न विचारताच तुम्ही कसे काय सुरु केले त्याबदल्यात हप्त्यापोटी ठरलेली रक्कम दिली नसल्याने आम्ही कंपनीचे काम चालु करु देणार नाही असे म्हणत म्हसवडचे नगरसेवक संग्राम शेटे व विलास पाटोळे यांनी गिरीराज रिन्युएबल प्रा. लि. शिरतांव ता. माण येथील कंपनीच्या हद्दीत बांधकाम पाडुन मँनेजरला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद म्हसवड पोलीस स्टेशनला कंपनी चे मँनेजर यांनी दिली असुन सदर फिर्यादीवरुन म्हसवड पोलीसांनी शेखर गोरे ,नगरसेवक संग्राम शेटे व विलास पाटोळे यांच्यासह अन्य १० ते १५ अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी म्हसवड पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे, वरकुटे -मलवडी व शिरतांव या गावच्या हद्दीत गिरीराज रिन्युएबल प्रा. लि. या सौर उर्जा कंपनीचे स्वमालकिच्या क्षेत्रात सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु असुन सदर ठिकाणी नगरसेवक संग्राम शेटे रा.म्हसवड व विलास पाटोळे रा. महिमानगड ता.माण या दोघांसह अन्य १० ते १५ अनोळखी इसमांनी येऊन शेखर गोरे यांना विचारल्याशिवाय तुम्ही येथे काम सुरुच कसे केले आम्ही तुम्हाला येथे काम करुच देणार नाही हप्त्यापोटी ठरलेली रक्कम दिल्याशिवाय काम सुरु होवु देणार नाही जर कोणी काम सुरु करावयास आला तर त्याचे हात पाय तोडुन टाकु अशी दमबाजी करीत कंपनीचे कर्मचारी विजय सिंग, मणिवण्ण व्यंकट, व कंपनीचे कॉन्ट्रक्टर सुहास पाटील, अविनाश माने, प्रशांत नणावरे, मंगेश चव्हाण, व इतर कामगार यांना वरील लोकांनी दमदाटी देत काम करीत असलेल्या स्थळावरुन हुसकावुन लावले. व वरील सर्व लोकांनी कंपनीच्या अंतर्गत वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले रस्ते जे.सी.बी च्या साह्याने उखडुन टाकले यावेळी कंपणीचे सिक्युरिटी गार्ड त्यांना अडवण्यास गेले असता त्यांनी गार्डच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करुन गार्ड कडील असणारे मोबाईलही काढुन घेत वरकुटे -मलवडी गावठाणचे हद्दीत कंपणीच्या ईन्हर्टर रुमचे बांधकाम जे. सी. बी.च्या सहाय्याने पाडुन टाकले.त्यावेळी आमच्या कंपनीचे सिक्युरिटी गार्ड हुसेन ईमानदार, अजित जगताप व लक्ष्मण दौंडे, संभाजी मंडले हे त्याठिकाणी हजर होते. यामध्ये कंपनीचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीचे वरकुटे -मलवडी गावच्या हद्दीत शेत जमीन गट क्र. १४५१, १३५५, व शिरतांव हद्दीत ३१६ मध्ये गिरीराज रिन्युएबल प्रा. ली. या कंपणीची जमीन असुन सदर जमीनीचा कोणताही दस्तावेज संबधीतांकडे नसताना कंपणीकडुन खंडणी म्हणुन काही रकमेची मागणी करुन पैसे मिळवण्याच्या उद्देशाने संग्राम शेटे व विलास पाटोळे यांनी संगनमत करुन शेखर गोरे यांच्या नावाचा वापर करुन कंपनीच्या सुरु असलेल्या कामाला अडथळा आणला असल्याची फिर्याद कंपणीचे मँनेजर दिलीप पट्टेबहाद्दुर वय २७ रा. नाशीक सध्या रा. दहिवडी ता. माण यांनी म्हसवड पोलीसांत दिली असुन या फिर्यादीवरुन म्हसवड पोलीसांनी शेखर गोरे, नगरसेवक संग्राम शेटे व विलास पाटोळे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन संग्राम शेटे व विलास पाटोळे यांना अटक केली आहे. अधिक तपास स.पो.नि मालोजीराव देशमुख हे करीत आहेत.

0 Comments