Ticker

6/recent/ticker-posts

उंब्रजला एक खड्डा, एक शिवी, एक पाटी आंदोलन


उंब्रज
गलेलठ्ठ पगार घेऊन , टक्केवारी खाऊनही कामे वेळेवर व निट न करता झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जाग यावी व 
प्रवाशाच्या जिवाशी सुरु असलेल्या खेळ थांबवावा अशी मागणी करत राज्य सरकार व बांधकाम विभागाचा निषेध करत प्रत्येक खड्यागणीस शिवी देत आज पाटण पंढरपूर राज्य मार्गावर  प्रदिप साळुंखे किवळकर व सहकारी यांनी अनोखं आंदोलन केले 
या वेळी उंब्रज, वडोली, मसूर,किवळ परिसरातील अशोक मदने,  सुधाकर जाधव, रविंद्र डकरे यांचेसहअनेक जण या अनोख्या आंदोलनात सहभागी होऊन रस्तावर मुरूम टाकत प्रशासनास शिव्या देत खड्डे मुजवण्यात आले
           उंब्रज -मसूर  या रस्त्याची मोठ मोठ्या खंड्यान मुळे चाळण झाली असून. राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आज पर्यंत अनेकांना आपले जिव गमवावे लागले असून प्रवाशांसह वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून या सर्व गोष्टीकडे डोळे झाक करून बांधकाम विभाग करत तरी काय असा सवाल या प्रसंगी उपस्थित केला गेला 
    या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना  या रस्त्याची अवस्था दिसत नाही का  का दिसूनही डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी बनत आहेत. वर्षातून एकदा रस्ता दुरूस्ती करायची व दाखवायची अनेकदा हे कुणासाठी चालते हे इथल्या जनतेला एकदा कळलच पाहिजे  असा सवालही साळुंखे यांनी यावेळी उपस्थित केला. 
        या ठिकाणाहून जाणार्‍या येणाऱ्याला हा रस्ता खड्यात आहे कि खड्डे रस्त्यात आहेत हे कळत कठीण होऊन बसले असून होणारे अपघात टाळण्यासाठी तरी या मार्गावरील रस्ता पुर्णपणे दुरुस्त व्हावा असी मागणी सुधाकर जाधव यांनी केली. या वेळी अशोक मदने यांनी  श्रमदान करून रस्त्यावरील खड्यात मुरूम टाकत शासचनाचा निषेध व्यक्त केला. या वेळी उंब्रज, वडोली, कवठे, हनुमानवाडी, कोणेगांव, मसूर  , चिखली, किवळ ,येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments