म्हसवड
येथील ऍड सचिन जाधव यांची सहायक सरकारी अभियोक्तापदासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहायक सरकारी अभियोक्ता गट 'अ' या स्पर्धा परीक्षेत जाधव यांनी कौतुकास्पद असे यश मिळवले.
राज्यभरात ठिकठिकाणी १७५ उमेदवारांची नेमणूक केली.त्यात जाधव यांनी गुणानुक्रमांकात नेत्रदिपक असे यश संपादन केले.
सातारा येथील इस्माईलसाहेब लॉ कॉलेज मधुन एलएलबी केल्यानंतर पुणे येथील भारती विद्यापिठातुन एलएलएम पदवी संपादन केली.
त्यानंतर त्यांनी सातारा,वडुज, म्हसवड,जत,इत्यादी न्यायालयात दिवाणी व फौजदारी खटल्याची वकीली केली.
त्यानंतर त्यांनी सातारा,वडुज, म्हसवड,जत,इत्यादी न्यायालयात दिवाणी व फौजदारी खटल्याची वकीली केली.
त्यांची आता वडवणी जि.बीड. येथील सहायक अभियोक्तापदी (गट 'अ' ) नेमणूक झाली आहे.
0 Comments