कापशी
फलटण तालुक्यातील कापशी येथे सातारा रस्त्यावर कारवाईसाठी गेलेल्या भरारी पथकावर वाळू माफियांनी हल्ला चढवला. या पथकातील तिघा तलाठ्यांसह एका कोतवालाला त्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन डंपरसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि. 28 रोजी सायं सव्वासातच्या सुमारास तलाठी किशोर विठ्ठल वाघ आदर्की, हणमंत उत्तम नागरवाड कापशी, सचिन नारायण क्षीरसागर तलाठी बिबी व राहुल भीमराव काकडे कोतवाल कापशी, यांचे भरारी पथक तहसिलदारांच्या आदेशाने डंपर क्र. एम. एच. 11 ए. एल 3400 व डंपर कमांक एम. एच. 11 सी. एच. 5304 मध्ये अंदाजे चार ब्रास वाळू चोरुन आणलेल्या डंपरवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय फलटण येथे त्याच ड्रायव्हरच्या मदतीने घेऊन जात होते. तेव्हा सरकारी काम करीत असताना तलाठी किशोर वाघ यांना संजय पवार, धनंजय कदम, प्रशांत भुजबळ, बाबू पवार, व इतर अनोळखी तीन लोकांनी मारहाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणाला तसेच हणमंत नागरवाड यांनाही शिवीगाळ करून दमदाटी केली. शिवाय कारवाई टाळण्याच्या उद्देशाने एक डंपर वाळू रस्त्यावर ओतून दिली व दुसरा डंपर वाळूसह घेऊन पलायन केल्याची फिर्याद किशोर वाघ यांनी लोणंद पोीलस ठाण्यात दिली.
या फिर्यादीवरून धनंजय कदम, रा. फलटण, नामदेव गणपत भोसले, रा. रेवंडे, ता. जि. सातारा यांना लोणंद पोाजलसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपाजनरीक्षक गणेश पवार हे करीत आहेत.
0 Comments