फोटो - विठठल खुडे
कातरखटाव
चोरीचा संशय आल्याने कातरखटाव येथिल युवकांनी सावधानता बाळगत चोरांना रंगेहाथ पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.
एैन दिवाळीत पहील्या ओघोळी दिवशीच कातरखटाव येथिल मुख्य पेठेतील दोन व्यापा-यांच्या दुकानावर चोरांनी डाव मारला होता. दुकांनांची शटर व फळया काढुन चोरांनी चार ते पाच हजारांच्या रकमेवर डाव साधला होता. त्यामुळे गावात चोरांची भिती वाढली होती. त्यातच कलेढोण येथिल कापड व्यापा-याच्या चोरीने तालुक्यात चांगलीच खळबळ माजली होती. अशातच काल रात्री चोरांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. गुरुवार दि. 26 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बनपुरी येथे नाइटचे क्रिकेट सामने खेळून आल्यानंतर कातरखटाव मधील मुख्य चौकात अनोळखी तीन इसम दिसले असता युवकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील दोघेजन दहिवडी रोड च्या दिशेने पळून गेले तर एकास त्याच पानटपरीत कोंडून ठेवले. त्यांनी पान टपरितील पाच हजार रुपये चोरल्याचे उघड झाले असून वडूज येथील विठ्ठल मोतीराम खुडे (वय:-३२) यांच्या सह अनोळखी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला करण्यात आलेलेा आहे. पुढील तपास हे. कॉ. धनाजी वायदंडे करीत आहे.

0 Comments