Hot Posts

6/recent/ticker-posts

आनेवाडी राडा, जामीन अर्जावर 3 रोजी सुनावणी


सातारा,
कोजागिरी पौर्णिमेला आनेवाडी टोलनाक्यावर झालेल्या राड्याप्रकरणी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंह गटाच्या संशयित व यादीत असलेल्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्या अर्जावर शुक्रवारी सातारा न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु वकिलांची गैरहजेरी व काहींचे म्हणणेही अपूरे असल्याने न्यायालयाने त्या अर्जावर दि. 3 रोजी सुनावणी ठेवली आहे.
आनेवाडी टोलनाक्याच्या प्रश्‍नावरून सातार्‍यात झालेल्या राड्यात दोन कार्यकर्त्यांसह पोलीसही जखमी झाले. त्यानंतर खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंह यांच्यासह दोन्ही बाजूकडील 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यादीत नावे असलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. त्यामध्ये तब्बल 15 हून अधिक जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान अजूनही पोलिसांकडून संशयितांची धरपकड सुरु आहे. सातारा शहर सोडून संशयितांनी परागंदा झाले आहेत. विशेष म्हणजे या संशयितांकडे पोलिसांची यादी असल्याने पोलिसांकडून चार हात दूरच हे राहिले आहेत. दरम्यान या टोलप्रकरणी तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात अटक होवू नये म्हणून न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज मिळावा म्हणून अर्ज दाखल केला असून त्या अर्जावर न्यायालयासमोर शुक्रवारी सुनावणी होती. या सुनावणीला अनेक संशयितांचे वकील व काही वकीलांनी अपुरे म्हणणे सादर केले. त्यामुळे न्यायालयाने त्यावर दि. 3 रोजी सुनावणी होणार आहे. त्याकडे शहरवासियांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.


Post a Comment

0 Comments