भारतीय जनता पक्षाच्या माण - खटाव विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव शिंदे यांची करण्यात आलेली निवड ही चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेली असुन या पदासाठी पक्षाने माझी सन २०१४ ते २०१९ या काळाकरीता निवड यापुर्वीच केलेली असुन अजुन माझा कार्यकाळ संपलेला नसताना व सदर निवडीचा अधिकार हा जिल्हाध्यक्ष अथवा भाजप प्रदेश कार्यकारीणीला असताना डॉ. येळगांवकरांनी शिवाजी शिंदे यांच्या नावाची घोषणा कशी काय केली त्यांना हा अधिकार आहे का ? असा सवाल उपस्थित करुन शिवाजी शिंदे यांच्या निवडीवर भाजपचे जेष्ठ नेते डॉ. महादेवराव कापसे यांनी आक्षेप घेत सदर निवड चुकीची असल्याचे म्हंटले आहे.
डॉ. कापसे यांनी याविषयी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की वडुज ता. खटाव येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत माण- खटाव मतदार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांच्या नावाची घोषणा माजी आ. डॉ. दिलीप येळगांवकर यांनी केली मात्र त्यांना सदर निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही वास्तवीक डॉ. येळगांवकरांना सदर निवडीचा कोणताही अधिकार नाही. तर या पदासाठी माझी पक्षाने सन २०१४ ते २०१९ या काळासाठी निवड केलेली असुन अद्याप ती मुदत संपलेली नसताना शिंदे यांची निवड चुकीची ठरणार आहे. माझी नियुक्ती सदर पदावर झाली त्यावेळी या समितीमध्ये अनिल भोसले, सतीश खाडे, डॉ. पेठे, धिरज दवे, विजय साखरे, बाळासाहेब खाडे, मार्तंड गुरव, डॉ. उज्वलकुमार काळे यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांचा समावेश होता व आजही ते सर्वजण आहेत. शिवाजीराव शिंदे यांची करण्यात आलेली निवड ही बेकायदेशीर असुन याबाबत आपण भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांची शिष्टमंडळासोबत भेट घेतली असुन त्यांनीही सदर निवडीबाबत आश्चर्य व्यक्त करीत तीव्र नापसंती व्यक्त करीत माझीच यापुढे निवड कायम ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान सर्वच राजकीय पक्षाला अंतर्गत गटबाजीने ग्रासले असुन या गटबाजीतुन भाजपही सुटला नसल्याचे यातुन दिसुन येत आहे.

0 Comments