Hot Posts

6/recent/ticker-posts

पाचगणीत मटका बुकी ताब्यात


पाचगणीत बस स्थानक परिसरात मटका घेणाऱ्या बुकीला पाचगणी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून व जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम हस्तगत केली.
याबाबत पाचगणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपोनि तृप्ती सोनावणे यांना त्यांच्या खबऱ्याकडून पाचगणी बसस्थानक परिसरात बेकायदा मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून सहाय्यक फौजदार संतोष कदम,उत्तम बाबर,पोलीस नाईक भरत जाधव,अभिजित घनवट,या टीमने बस स्थानक परिसरात जाऊन स्थानकातील पार्किंग मध्ये एक इसम मोटर सायकल वर बसून काहीतरी संशयास्पदरित्या लिहीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्या बुकीसमोर दोन इसम मटका घेत असल्याची खात्री पोलिसांची झाली.त्यावरून पोलिसांनी संबंधित बुकीला पकडले.मात्र यावेळी अंधाराचा फायदा घेऊन मटका खेळणारे दोन इसम पसार होण्यात यशस्वी झाले.पोलिसांना  बुकी दिलीप बबन कासुर्डे (वय 48) रा.गाडेकर चाळ, जैन मंदिर रोड पाचगणी यांना मुंबई मटका जुगाराचे साहित्य,पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या स्लिप आणि जुगाराची रोख रक्कम १०६०० रुपये बेकायदा जवळ बाळगल्या प्रकरणी पोलीस नाईक जितेंद्र कांबळे यांच्या फिर्यादीवरून त्यांना ताब्यात घेतले.त्यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा १२/अ अन्वये कारवाई करण्यात आली. अधिकचा तपास सपोनि तृप्ती सोनावणे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments