कराड
आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त लिबर्टी मजदूर मंडळाच्यावतीने दिनांक 1 ते 4 डिसेंबर 2017 अखेर 65 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी 25 पुरुष संघ व 22 महिला संघ आणि 50 पंच सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे, अशी माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाषराव पाटील (काका) यांनी स्पर्धेच्या क्रिडांगण तयार करण्याच्या कामाच्या पहाणी प्रसंगी दिली.
या प्रसंगी रामभाऊ कणसे, रणजीत पाटील (नाना), विशाल शिंदे, गणशे पाटील, राजेंद्र जाधव, रमेश जाधव व लिबर्टी मजदूर मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
क्रीडांगण तयार करण्याच्या पाहणी प्रसंगी सर्वश्री सुभाषराव पाटील (काका), रामभाऊ कणसे, रणजीत पाटील (नाना) व लिबर्टी मजदूर मंडळाचे सदस्य.
0 Comments